Ayodhya results maintain respect for both sides; District residents should keep peace: Superintendent of Police, Amogh Gavkar | अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर
अयोध्या निकाल दोन्ही बाजूंचा सन्मान राखणारा; जिल्ह्यवासीयांनी शांतता ठेवावी : पोलीस अधीक्षक अमोघ गावकर


अकोला : अयोध्या येथील वादग्रस्त जमिनीच्या प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांनी जिल्हावासीयांना शांततेचे आवाहन केले आहे. हा निकाल दोन्ही बाजूने समसमान लागला असून कोणाचाही विजय किंवा पराजय या निकालाने झाला नसल्याचे त्यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत
स्पष्ट केले. शाळा महाविद्यालय सुरूच राहणार असून सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे. बाजारपेठ बंद किंवा सामान्य नागरिकांना त्रास होईल अशाप्रकारचा कुठलिही कारवाई पोलिसांकडून करण्यात येणार नाही. मात्र सण-उत्सव हे परंपरेनुसार साजरे करण्याचे आवाहन अमोघ गावकर यानी केले. दुचाकी रॅली, चार चाकी रॅली तसेच मिरवणूक, महाआरती सार्वजनिकरीत्या फटाके फोडणे, चौकात येऊन मिठाई वाटप करणे, यासारख्या संपूर्ण कार्यक्रमांवर चार ते पाच दिवस  प्रतिबंध करण्यात आले आहेत. मात्र अतिरेक होणार नाही, कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, अशा प्रकारचे धार्मिक उत्सव हे परंपरेनुसार कौटुंबिक वातावरनात साजरे करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल गावकर यांनी पत्रकार परिषदेतून केले. घरोघरी साजरी होणाऱ्या तुळशी विवाहाचे फटाके फोडायचे असल्यास ते कमी प्रमाणात किंवा न फोडले तरीही चालेल; मात्र असेल तर ते स्वतःच्या घरासमोर फटाके फोडण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले. आयोध्या प्रकरणाचा निकालाचे दोन्ही बाजूने स्वागत करण्यात आले असून कोणीही अफवा किंवा सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ ेसेजेस यावर विश्‍वास ठेवू नये असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारचे मेसेजेस व्हिडिओ किंवा फोटो कोणी व्हायरल केल्यास त्यांच्यावर ही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षक अमोल गावकर यानी दिला.
 

1992 सली झालेल्या दंगलीतील जिल्ह्यात जेवढे आरोपी आहेत त्यांच्यावर दोन दिवसांपासूनच नजर ठेवण्यात येत आहे. या सर्व आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच ते पोलिसांच्या नजरेत आहेत. -  अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक, अकोला

Web Title: Ayodhya results maintain respect for both sides; District residents should keep peace: Superintendent of Police, Amogh Gavkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.