शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला भाजीबाजारातून आजारांची विक्री!

By admin | Updated: October 27, 2014 01:26 IST

पावसामुळे घाणीचे साम्राज्य, भाजी विक्रेते व ग्राहक त्रस्त.

अकोला: सध्या सर्वत्रच विविध आजारांनी थैमान घातले असताना भाजी बाजारात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. डुकरे, जनावरे, घाण पाणी व चिखलाच्या बाजूलाच असलेल्या भाजीबाजारातून भाजीपाला नव्हे तर आजारांची विक्री होत आहे. दिवाळीनिमित्त संपूर्ण भाजीबाजार सजला होता. शहरासह ग्रामीण भागातील व्यावसायिकांनी दिवाळीनिमित्त बाजारात फुले व विविध फळांची दुकाने लावली होती. दिवाळीमध्ये फुलांची विक्री न झाल्यामुळे घरी घेऊन जाण्याऐवजी दुकानदारांनी बाजारातच फुले टाकून दिली. तसेच या ठिकाणी नारळपाणी व उसाची विक्री करण्यात येते. नारळातील पाणी पिल्यानंतर ग्राहक नारळ तेथेच टाकून देतो तर उसाची खरेदी करताना त्यावरील पाला पाचोळा त्याच ठिकाणी फेकून देण्यात येतो. या कचर्‍यावर पाऊस पडल्यामुळे भाजीबाजारा त सध्या प्रचंड घाण पसरली आहे. हा कचरा सडला असून, या ठिकाणी डुकरे, गाई, बकर्‍या चरत आहेत. याच ठिकाणी भाजीविक्रेत भाजीपाला विकत आहेत. दुकानाशेजारीच घाणीचे डबके साचले असल्यामुळे भाजीपाल्यावर विषाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वत्र आजारांनी थैमान घातले असून, रुग्णालये फुल्ल आहेत. त्यातच घाणीच्या साम्राज्यात भाजीपाल्याच्या विक्रीमुळे आजारांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.