अकोला जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:18 IST2021-04-11T04:18:21+5:302021-04-11T04:18:21+5:30

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या रेमडेसिवीर कोविड हॉस्पिटल्सशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. तसेच शासकीय रुग्णालयातही ...

Adequate stocks of Remedesivir available in Akola district | अकोला जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध

अकोला जिल्ह्यात रेमडेसिवीरचा पुरेसा साठा उपलब्ध

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सध्या रेमडेसिवीर कोविड हॉस्पिटल्सशी संलग्न मेडिकल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. तसेच शासकीय रुग्णालयातही साठा आहे. ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन्स हवे असतील त्यांनी डॉक्टरांची चिठ्ठी सही शिक्क्यासह, तसेच आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल, रुग्णाचे आधारकार्ड, खरेदीसाठी येणाऱ्या व्यक्तीचे फोटो ओळखपत्र दुकानदारास दाखविणे अनिवार्य आहे.

जिल्ह्यात अकोला शहरातील आयकॉन मेडिकल, व्हीएनआरएन मेडिकल, दत्त मेडिकल, वर्षा मेडिकल, ॲपल मेडिकल, मैत्री मेडिकल, आरोग्यम स्वस्त औषधी, वननेस फार्मा, जाई मेडिकल, सूर्यचंद्र मेडिकल, केअर मेडिकल, आधार मेडिकल येथे तर मूर्तिजापूर येथील अवघाटे मेडिकल व सुविधा मेडिकल या ठिकाणी रेमडेसिवीर विक्रीसाठी उपलब्ध आहे

तथापि, कुणालाही यासंदर्भात औषध उपलब्धतेबाबत अडचणी निर्माण झाल्यास अकोला जिल्ह्यातील नागरिकांनी औषध निरीक्षक सं. मो. राठोड (मोबाईल क्रमांक-९९२३३०४६५०) संपर्क साधावा. प्रशासनातर्फे याबाबत दररोज आढावा घेतला जात असून कुठेही तुटवडा निर्माण होणार नाही, याचे नियोजन केले जात आहे, असेही सुलोचने यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Adequate stocks of Remedesivir available in Akola district