शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 01:19 IST

ग्राहकांना अचूक व वेळेत बिल द्या : प्रादेशिक संचालक यांचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: वीज ग्राहकांचे अचूक मीटर रीडिंग घेऊन वेळेत बिल देण्याकरिता महावितरण प्रयत्नरत असून, मात्र फेरतपासणी दरम्यान अकोला ग्रामीण विभागांतर्गत ग्राहकांच्या वीज मीटरचे सदोष रीडिंग घेणाऱ्या एजन्सीच्या दोन कर्मच्याऱ्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सोमवारी दिले. अकोला शहर व ग्रामीण विभागाची आज गोरक्षण मार्ग व विद्युत भवन कार्यालय येथे त्यांनी वेगवेगळी आढावा बैठक घेतली.ग्राहकांना अचूक व योग्य वीज देयक देण्यासाठी महावितरणने मोबाइल अ‍ॅप्सद्वारे वीज मीटर रीडिंगची प्रणाली विकसित केल्यामुळे रीडिंगची पद्धत सोपी झाली आहे; मात्र रीडिंग एजन्सीकडील कर्मचारी मात्र सदोष रीडिंग घेताना निदर्शनास येत असल्यामुळे महावितरणचे अभियंते व कर्मचाऱ्याकडून दररोज ५ टक्के मीटर रीडिंगची फेरतपासणी राज्यभर सुरू आहे. यामध्ये दोषी आढळलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी दिले. सोबतच मीटर रीडिंग एजन्सीच्या कार्यरत कर्मचाऱ्यांचे आधार क्रमांक यंत्रणेमध्ये जोडले असल्यामुळे भविष्यामध्ये सदर कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात महावितरणमध्ये काम करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदोष मीटर रीडिंगमुळे महावितरणच्या महसुलाबरोबरच ग्राहकांनी नाहक त्रास सहन करावा लागतो, तरी यासंदर्भात अभियंते व कर्मचाऱ्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन त्यांनी केले.महावितरणने ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घेण्यासाठी सर्व ग्राहकांचे मोबाइल क्रमांक नोंदणी तातडीने करून घ्यावी, तसेच कंपनीची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या वीज बिलाची वसुली तत्परतेने करून थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याचे निर्देशही प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी यावेळी दिले.यावेळी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता अरविंद भादीकर, अधीक्षक अभियंता दिलीप दोडके, कार्यकारी अभियंते धर्मेंद्र मानकर व देवेंद्र उंबरकर तसेच सर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व वित्त व लेखा विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.