शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आईच्या खूनप्रकरणी आरोपी मुलास जन्मठेप

By admin | Updated: May 22, 2015 01:58 IST

न्यायालयातून आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

वाशिम : चारित्र्यावर संशय घेऊन आईचा खून केल्याप्रकरणी प्रकाश किसन निखाते या आरोपी मुलास येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश वि. रा. सिकची यांनी २१ मे रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रिसोड शहरातील देशमुख गल्ली येथे १४ डिसेंबर २0१२ रोजी पहाटे चारच्या सुमारास हे खूनप्रकरण घडले होते. प्रकाश किसन निखाते (२६) व त्याची आई रेणुकाबाई किसन निखाते (५0) हे दोघे एकत्र राहत होते. आरोपीच्या वडिलाचे निधन दहा ते बारा वर्षांपूर्वी झाले होते. रेणुकाबाई हिने नातेवाइकांच्या मदतीने मुलाचे लग्न लावून दिले होते. त्याची पत्नी नेहमी आजारी राहत असे. शिवाय प्रकाशला दारूचे व्यसन लागल्यामुळे रेणुकाबाईने त्याच्या पत्नीस माहेरी पाठवून दिले होते. या कारणावरून तसेच आईच्या चारित्र्यावर संशय असल्याने त्याचा तिच्यावर राग होता. १३ डिसेंबर २0१२ रोजी रात्री रेणुकाबाई व प्रकाश दोघे घरात पलंगावर झोपी गेले. आईचा राग मनात ठेवून त्याने रात्री ३ ते ४ च्या सुमारास सुरीने गळा कापून व घरातील दगडी पाटा डोक्यावर हाणून रेणुकाबाईचा निर्घृण खून केला. सकाळी उठल्यानंतर त्याने शेजार्‍यांना पलंग तुटल्याने आई जखमी झाल्याचा बनाव केला. याप्रकरणी रिसोड पोलिसांत त्याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३0२, २0१, अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वि. रा. सिकची यांच्या न्यायालयात झाली. न्यायालयाने प्रकाशला खूनप्रकरणी जन्मठेप व एक हजार दंड तसेच पुरावा नष्ट केल्याबद्दल तीन वर्षे सक्तमजुरी व शंभर रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे साहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड. अरुण सरनाईक यांनी युक्तिवाद केला.

*न्यायालयातून आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न

       जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर न्यायालयाच्या वरच्या मजल्यावरून पोलिसांसोबत खाली येत असताना आरोपी प्रकाशने पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस उपनिरिक्षक योगेश धोत्रे काही आरोपींना न्यायालयात नेत होते. आरोपी पळत असल्याचे दिसताच त्यांनी पाठलाग करून कोशागार कार्यालयाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ३.१५ वाजता प्रकाशला पकडले.