शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ७५ हजारांवर ग्रामीण शाळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: May 22, 2015 01:55 IST

पटसंख्येत घट होत असल्यामुळे आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी भटकंती करण्याची पाळी आली आहे.

हर्षनंदन वाघ/बुलडाणा : सध्या शहरी भागातील शाळांच्या शिक्षकांनी ग्रामीण भागात विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे. त्यातच ग्रामीण भागातील पालकांचाही कल आता आपल्या पाल्यांना शहरात शिकविण्याकडे वाढत असल्याने व शहरी भागात कॉन्व्हेंट संस्कृती वाढल्याने ग्रामीण भागातील शाळांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. घटती पटसंख्या, पाच दिवसांचा आठवडा याचाही परिणाम या शाळांवर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात असलेल्या राज्यातील जवळपास ७५ हजार ५६ शाळा अडचणीत आल्या आहेत. राज्यातील विविध शहरांसह ग्रामीण भागातील एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाने शाळांची मोठय़ा प्रमाणात खैरात वाटली होती. त्यामुळे राज्यातील शाळांची संख्या १ लाख ७ हजारांवर पोहोचली. त्यात ग्रामीण भागातील ७५ हजार ५६ शाळांचा समावेश आहे. छोट्या-छोट्या गावांतही माध्यमिक शाळा सुरू झाल्या. दुसरीकडे शाळा वाढल्या असल्या तरी ग्रामीण भागातील लोकसंख्या स्थिर आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिकांचा कल आता शहराकडे वाढल्याने लोक गाव सोडून शहरात स्थिरावले आहेत. जे गावाकडे आहेत, त्यांची मुले बहुतांश शहरातील शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत आहे. अनेक शाळांना तर विद्यार्थीच मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातच विद्यार्थी मिळवण्यासाठी शिक्षकांना घरोघरी फिरावे लागत असताना शहरी भागातील शिक्षकही विद्यार्थ्यांच्या शोधात ग्रामीण भागात फिरत आहेत. अशा स्थितीत गावातील शाळा भकास पडण्याची चिन्हे आहेत. विद्यार्थी शाळेत दाखल व्हावा, यासाठी शाळांमार्फत गणवेशासह विद्यार्थ्यांना लागणारे इतर सर्व साहित्य देण्याचे आश्‍वासन दिले जाते. यामध्ये गावातून विद्यार्थ्याला शाळेत ये-जा करण्याची व्यवस्थाही शाळाच करीत आहेत. * पालकांचा कल इंग्रजी शाळांकडेग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे असल्याने मराठी शाळांमध्ये शुकशुकाट दिसून येतो. शहरात गल्लोगल्ली कॉन्व्हेंटला उधाण आले असताना ग्रामीण भागातही हे फॅड वाढीस लागले आहे. शहरात आता विद्यार्थी मिळत नाही, हे शहरी शाळा व्यवस्थापनाच्या लक्षात आल्याने व वाढत्या स्पर्धेला तोंड देत शाळा सुरू ठेवण्यासाठी शाळा व्यवस्थापनाने शिक्षकांना विद्यार्थी शोधमोहिमेवर लावले आहे. बुलडाणा जिल्ह्यात २ हजार ३६४ शाळाबुलडाणा जिल्ह्यात शासनाने २ हजार ३६४ शाळा सुरू केल्या आहेत. त्यापैकी ग्रामीण भागातील १ हजार ७९४ शाळा आहेत. या शाळांपैकी काही आदिवासी, दुर्गम भागात आहेत. शासनाने खासगी संस्थांना दिलेल्या आश्रमशाळा, शहरी भागात वसतिगृहाची सोय तसेच नागरिकांचा राहणीमानाचा वाढलेल्या दर्जा आदी कारणांमुळे ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे.