शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

२.९७ लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी २४८ कोटींचा प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:21 PM

मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये अपेक्षित मदत निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून, पीक नुकसानाचा अंतीम अहवाल मंगळवारी तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील २ लाख ९७ हजार ६६८ शेतकऱ्यांच्या ३ लाख ६५ हजार ६९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईपोटी शेतकºयांच्या मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये अपेक्षित मदत निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत बुधवारी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून, ज्वारीला कोंब फुटले. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्या आहेत. त्यामुळे अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात खरीप पिकांचे उत्पादन बुडाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायकांच्या संयुक्त पथकांद्वारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम ८ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले. जिल्ह्यातील सातही तालुक्यातील पीक नुकसानाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील पीक नुकसानाचा एकत्रित अंतीम अहवाल १२ नोव्हेंबर रोजी तयार करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १ हजार ४ गावांमध्ये २ लाख ९७ हजार ६६८ शेतकºयांचे ३ लाख ६५ हजार ६९ हेक्टर ४ आर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाच्या अंतीम अहवालासह शेतकºयांना पीक नुकसान भरपाईच्या मदतीसाठी २४८ कोटी २४ लाख ७१ हजार ९८८ रुपये मदतनिधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत १३ नोव्हेंबर रोजी शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.पीकनिहाय असे आहे नुकसान!अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यात १ लाख ७३ हजार ४०५ हेक्टर सोयाबीन, १ लाख ५३ हजार ९५ हेक्टर कापूस, १ हजार ४६० हेक्टर तूर, १० हजार ८३४ हेक्टर ज्वारी, १०६ हेक्टर तीळ, २० हेक्टर मका आणि २६ हजार १४५ हेक्टर इतर पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

अधिकाºयांची घेतली बैठक!जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करण्यासाठी मंगळवार, १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी अधिकाºयांची बैठक घेतल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला.

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी