शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रक्तदानासाठी तरुणांनी पुढे यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:19 IST

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी दरेवाडी (ता. नगर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी विवेकानंद वाचनालय आणि जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने ...

गुढीपाडवा आणि हिंदू नववर्षानिमित्त मंगळवारी दरेवाडी (ता. नगर) येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, स्वामी विवेकानंद वाचनालय आणि जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

बेरड म्हणाले की, इतर वेळी राजकीय कार्यक्रम किंवा ग्रामीण भागात यात्रा, जत्रेच्या वेळी रक्तदान शिबिरातून मोठ्या प्रमाणात रक्त संकलन होत असते, मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर हे सर्व कार्यक्रम बंद असल्याने रक्तसंकलन होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. परंतु गावागावातून तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आले तर काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळेल.

उपसरपंच अनिल करांडे म्हणाले, दरेवाडी ग्रामस्थ विधायक कामासाठी नेहमीच पुढे असतात. या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात शासकीय नियमांचे पालन करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सचिन बेरड, संदीप आसाराम बेरड, श्रीकांत नवनाथ कराळे, अक्षय दत्तू चव्हाण, प्रशांत अविनाश बेरड, किरण अंबादास बेरड, प्रशांत भीमराज बेरड, मार्गदर्शक सुभाष नाना बेरड आदी उपस्थित होते.

---------

फोटो मेलवर

१३दरेवाडी रक्तदान शिबिर

गुढीपाडव्यानिमित्त दरेवाडी येथे झालेल्या रक्तदान शिबिरात तरुणांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले.