शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
2
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
3
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
4
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
5
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
6
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
7
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
8
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
9
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
10
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
11
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
12
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
13
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
14
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
15
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
16
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
17
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
18
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
20
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाउंडेशनचे कार्य लोकचळवळ बनले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:25 IST

पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२०-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ०४) घुलेवाडीतील (नाशिक ...

पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा २०२०-२०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि. ०४) घुलेवाडीतील (नाशिक रस्ता) अमृता लॉन्स येथे ‘समृद्धीच्या वाटेवरील गावांचा सन्मान सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. पोळ बोलत होते.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील मांची, सावरगाव तळ, पेमगिरी, भोजदरी, कुंभारवाडी, खंदरमाळवाडी, पिंपळगाव माथा, पिंपळगाव देपा, मोधळवाडी, खरशिंदे, कणसेवाडी, म्हसवंडी, पोखरी बाळेश्वर, सायखिंडी या समृद्ध गाव स्पर्धेतील सहभागी पात्र गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, जलमित्र आणि ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.

आमदार सुधीर तांबे, संगमनेर पंचायत समितीच्या सभापती सुनंदा जोर्वेकर, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, संदीप वायाळ, तालुका कृषी अधिकारी प्रवीण गोसावी, सामाजिक वनीकरण विभागाच्या राेपवन अधिकारी सोनाली गिरी, उमेदचे तालुका व्यवस्थापक रवींद्र खलाटे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, संगमनेर तालुका समन्वयक राजेंद्र जाधव, अजिंक्य गुरव, स्वप्निल कोल्हे,गोकुळ उगले आदी यावेळी उपस्थित होते.

ग्रामीण पर्यावरण व्यवस्थेचा आणि अर्थशास्त्राचा कायापालट करण्यासाठी राज्यात पाणी फाउंडेशनने ‘सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्याद्वारे जलसंधारणातून गावात जलसमृद्धी आणण्यासाठी तालुक्यातील १२ गावांतील ग्रामस्थ मेहनत घेत आहेत.