‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:13+5:302021-07-15T04:16:13+5:30

संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात बुधवारी (दि. १४) टॅलेंट हंट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाला. यावेळी ते ...

Two thousand students participate in the 'Talent Hunt' competition | ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

‘टॅलेंट हंट’ स्पर्धेत दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयात बुधवारी (दि. १४) टॅलेंट हंट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ कोरोनाचे नियम पाळून संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. विवेक धुमाळ होते. व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा. जी. बी. काळे, प्रा. जे. के. सातपुते, प्रा. मिलिंद इंगोले, प्रा. बी. एल. कुलकर्णी, प्रा. नीलिमा चौधरी, प्रा. मनिष सातपुते, प्रा. विवेक कांढोरे, प्रा. ईश्वर फापाळे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत संगमनेर, अकोले, सिन्नर व राहाता तालुक्यातील दोन हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात सह्याद्री विद्यालयाचा तनिष्क तोरे याने प्रथम क्रमांक मिळवला. सह्याद्री विद्यालयाच्या आयुष्य संजय निर्मळ याने द्वितीय पारितोषिक तर लोणी येथील अभिजित जिजाबा खोले याने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. प्रास्ताविक प्रा. फापाळे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. प्रा. काळे यांनी आभार मानले.

-------------------

आई-वडिलांचादेखील सन्मान

उत्तेजनार्थ बक्षीस जळगाव येथील कनिष्क पाटील, डेरे इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रवीण कुलकर्णी, लोणी विखे विद्यालयाचा वेदांत नेहुलकर आणि चंदनापुरी येथील वैभव सरोदे यांनी उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, रोख बक्षीस देत त्यांच्या आई-वडिलांचादेखील सन्मान करण्यात आला.

Web Title: Two thousand students participate in the 'Talent Hunt' competition