व्यसनमुक्ती लघुपटाचे राज्यस्तर स्पर्धेत यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:53+5:302021-09-07T04:25:53+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तयार केलेल्या व्यसनमुक्ती या लघुपटाने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक ...

व्यसनमुक्ती लघुपटाचे राज्यस्तर स्पर्धेत यश
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने तयार केलेल्या व्यसनमुक्ती या लघुपटाने राज्यस्तरावर पाचवा क्रमांक पटकाविला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून सलाम मुंबई फाउंडेशनने ‘तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास प्रोत्साहन देण्यासाठी व्हिडिओ बनवा’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय अभ्यासक्रमातील तंबाखू नियंत्रण संदेशाला अनुसरून तंबाखू सेवन न करण्याविषयी संदेश देणे हा या स्पर्धेचा मुख्य विषय होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला.
राज्यातील एकूण १०४ संघांनी यात सहभाग नोंदविला. यात अरणगाव शाळेने उत्कृष्ट पद्धतीने संदेश देताना पाचवा क्रमांक पटकाविला. यासाठी उपक्रमशील शिक्षक राजेंद्र पोटे यांची संकल्पना व दिग्दर्शन असून ओंकार प्रॉडक्शनने या लघुपटाची निर्मिती केली आहे. हरी साळुंके यांनी कथा, पटकथा व संवाद लेखन केले. ओंकार पोटे यांनी छायांकन केले. या लघुपटात परशुराम सोंडकर, हरी साळुंके, बाळासाहेब तरटे, छबन चेडे यांनी भूमिका केल्या. मुख्याध्यापिका शोभा साबळे, वंदना कारखिले, पुष्पा ठुबे, बेबी पिंपरकर, मंगल पोटे यांचे सहकार्य लाभले.
050921\1847img-20210904-wa0005.jpg
राज्यस्तरीय पाचवा क्रमांक प्राप्त व्यसनमुक्ती लघुपटातील एक क्षण .