संगमनेरात वाइन शॉपला तीव्र विरोध कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:56+5:302021-09-18T04:22:56+5:30
संगमनेर : शहर हद्दीत सावतामाळीनगर परिसरात दोन धार्मिक स्थळे, नागरी वसाहत, तसेच जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या परिसरात वाइन ...

संगमनेरात वाइन शॉपला तीव्र विरोध कायम
संगमनेर : शहर हद्दीत सावतामाळीनगर परिसरात दोन धार्मिक स्थळे, नागरी वसाहत, तसेच जवळच पोलीस वसाहतदेखील आहे. या परिसरात वाइन शॉप सुरू करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे संबंधितांनी अर्ज केला आहे. मात्र, येथे वाइन शॉप सुरू करण्याला अनेकांचा तीव्र विरोध कायम आहे. त्यासंदर्भाने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांना निवेदन दिल्याचे दारूबंदी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षा ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले.
अकोले रस्ता येथील सावतामाळीनगर परिसरात १९८८ सालचे धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी असलेले विठ्ठल मंदिर आहे, तसेच संबंधित वाइन शॉप स्थलांतरित प्रस्तावाच्या जागेशेजारी कादर बादशहा कादरी मस्जिद (ट्रस्ट क्रमांक बी १४७) इदगाह रस्ता, सावतामाळीनगर, संगमनेर ही मस्जिद आहे. येथे नागरी वसाहत असून, येथील रहिवासी, दारूबंदीचे कार्यकर्ते, तसेच भाविकांचा वाइन शॉप सुरू करण्यास तीव्र विरोध आहे. येथे वाइन शॉप सुरू झाल्यास आंदोलन करणार असल्याचे ॲड. गवांदे यांनी सांगितले.