शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीत डेंग्यूचा तिसरा बळी?

By admin | Updated: September 18, 2016 01:50 IST

शिर्डी : शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया, गोचीड तापासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून महिनाभरात डेंग्यूसदृश आजाराने तिसरा बळी घेतला आहे़

शिर्डी : शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणिया, गोचीड तापासारख्या साथीच्या आजाराने थैमान घातले असून महिनाभरात डेंग्यूसदृश आजाराने तिसरा बळी घेतला आहे़ शिर्डीत मोठ्या प्रमाणावर फैलावलेल्या रोगांवर नियंत्रण मिळवण्याबाबत प्रशासन फारसे गंभीर दिसत नसल्याने प्रशासनाला आणखी किती बळी हवे, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे़ दरम्यान, या आजाराच्या फैलावाला जबाबदार असलेल्या नगरपंचायत प्रशासनाला जबाबदार धरत येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भुजबळ यांनी नगरपंचायत विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा अर्ज शिर्डी पोलिसात अर्ज दिला आहे़शनिवारी अनू अजय सोनी ही आठ वर्षांची बालिका डेंग्यूसदृश आजाराने मृत्यूमुखी पडल्याची माहिती नगरसेविका वैशाली वेणूनाथ गोंदकर यांनी दिली आहे़ श्रीरामनगर भागातील ही मुलगी असून गेल्या पंधरवाड्यातही या भागातील शगुप्ता कुरेशी या दहावीतील मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे़ याशिवाय येथे आणखी एक महिलाही दगावल्याचे सांगण्यात येते़ याबाबत मलेरिया विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन डास नियंत्रणासाठी प्रबोधन करत असल्याचा दावा प्रशासन करत असले तरी ते खरे नसल्याचा आरोप गोंदकर यांनी केला आहे़ (तालुका प्रतिनिधी)