शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात शंकरराव गडाखांना राष्ट्रवादीची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 13:08 IST

नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँगे्रसने पाठिंबा जाहीर केला आहे़ त्यामुळे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंपुढील आव्हान वाढले आहे़ 

अहमदनगर : नेवासा मतदारसंघातील क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी काँगे्रसने पाठिंबा जाहीर केला आहे़ त्यामुळे भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटेंपुढील आव्हान वाढले आहे़ २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत गडाख हे राष्ट्रवादी काँगे्रसचे उमेदवार होते़ मात्र, राष्ट्रवादीतील काहींनी मुरकुटे यांना मदत केली़ त्यामुळे गडाख यांचा पराभव झाला होता़ ही बाब गडाखांनी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली होती़ तेव्हापासून गडाख राष्ट्रवादीत नाराज होते़ त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून क्रांतिकारी शेतकरी पक्षाची स्थापना केली़ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत क्रांतिकारी शेतकरी पक्षाने नेवाशात चांगले यशही मिळविले़ नेवासा पंचायत समितीतही क्रांतिकारी शेतकरी पक्षाची सत्ता आहे़ विधानसभा निवडणुकीत गडाख यांनी अपक्ष अर्ज भरला आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देणार, अशी चर्चा रंगली होती़ राष्ट्रवादी, भाजप व गडाख अशी तिरंगी लढत नेवाशात रंगणार असल्याच्या चर्चा होत्या़ या तिरंगी लढतीमुळे मुरकुटेंना निवडणूक सोपी होईल, अशी अटकळ मतदारसंघात बांधली जात होती़ मात्र, आता राष्ट्रवादी काँगे्रसने उमेदवार न देता गडाखांनाच पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे़ नेवाशात राष्ट्रवादीने शंकरराव गडाख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष पूर्ण ताकदीनिशी गडाखांच्या पाठिशी उभा राहणार आहे, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सांगितले.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019