शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियास सक्तमजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2016 01:23 IST

कोपरगाव : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियास एक महिना सक्तमजुरी व पाचशे रूपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी सुनावली़

कोपरगाव : वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाळू माफियास एक महिना सक्तमजुरी व पाचशे रूपये दंडाची शिक्षा कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी सुनावली़कोपरगाव तहसील कार्यालयाच्या पथकाने १७ जून २०११ रोजी डाऊच खुर्द येथे एमएच १५ सीके ६८६० क्रमांकाचा चोरटी वाळू वाहतूक करणारा ट्रक पकडला़ याबाबत ट्रकचालक जालिंदर रामनाथ शिरसाठ (रा़ मुसळगाव, ता़ सिन्नर) याच्याकडे वाळू वाहतुकीचा परवाना भररी पथकाने मागितला, तो त्याच्याजवळ नव्हता़ त्यानंतर पथकाने जालिंदर शिरसाठ विरूद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला़ सदर दाव्यात सरकार पक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले़ त्यावरून गुन्हा सिद्ध झाला़ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए़ बी़ शेंडगे यांनी आरोपीस एक महिना सक्तमजुरीची शिक्षा व ५०० रूपये दंड ठोठावला़ सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी अभियोक्ता बी़ डी़ भोईटे यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)