शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे ससाणे यांची माघार

By admin | Updated: December 22, 2015 16:51 IST

विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली.

 अहमदनगर : विधान परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे चार दिवस बाकी असताना सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार जयंत ससाणे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मुंबईत बैठक झाल्यानंतर ससाणे यांना माघार घेण्याचे आदेश काँग्रेसकडून देण्यात आले. पक्षादेश मानून आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे ससाणे यांनी स्पष्ट केले. जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ससाणे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, शहराध्यक्ष दीप चव्हाण, सचिन गुजर, विनायक देशमुख, उबेद शेख उपस्थित होते. माघारीबाबत बोलताना ससाणे यांनी स्पष्ट केले, कोणतीही राजकीय पार्श्‍वभूमी नसताना काँग्रेस पक्षाने दहा वर्षे आमदार पद दिले. शिर्डी संस्थानचे अध्यक्ष केले. जिल्हाध्यक्ष पद दिले. निवडणुकीत पक्षाच्या आदेशाने निवडणूक अर्ज दाखल केला होता. पक्षाच्या आदेशाने तो कायम ठेवला आणि पक्षाच्या आदेशाने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे सांगितले. गत पंचवार्षिकला ही जागा काँग्रेसची होती. त्यावेळी निवडणूक लढवली. मात्र, पराभवास सामोरे जावे लागले. याबद्दल कोणालाही दोष देत नाही. पराभवानंतर पुन्हा सकारात्मक राजकारण सुरू केले. स्थानिक स्वराज संस्थांचे प्रतिनिधी या मतदार संघातील मतदार आहेत. स्थानिक स्वराज संस्थेत काम करण्याची आवड होती. यामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा होती, असे ते म्हणाले. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मुंबईसह राज्यात काही ठिकाणी राष्ट्रवादीच्या बंडखोरांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे नगरमध्ये पक्षाने मला उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राज्यातील राजकारणात काही राजकीय तडजोडी झाल्या. यात नगरची जागा राष्ट्रवादीला गेली. पक्षाला मानणारा कार्यकर्ता असल्याने या निवडणुकीतून माघार घेत आहे. राज्याच्या राजकारणात पक्षाने माझा वापर केला असेल तर ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे ससाणे शेवटी म्हणाले.(प्रतिनिधी)