शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टातील चहावाल्याने खुनातील आरोपीला ओळखले; बाटलीवरुन लागला शोध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 14:17 IST

पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे.

Rauri Murder Case: राहुरी येथील न्यायालयाच्या आवारातील चहावाल्याने वकील दाम्पत्याच्या खुनातील आरोपी शुभम महाडिक याला ओळखल्याचं स्पष्ट झालं आहे.  हत्येपूर्वी वकील दाम्पत्य राहुरीन्यायालयात आले होते. तेथून ते आरोपींसोबत त्यांच्या घरी गेले होते. या दरम्यान, त्यांना अॅड. रामदास बाचकर व चहावाला भाऊराव दादासाहेब तमनर यांनी पाहिलेले होते. या दोघांची साक्ष सुनावणीदरम्यान नोंदवण्यात आली. या खून खटल्याची पुढील सुनावणी फेब्रुवारीमध्ये होणार असून, शनिवार व रविवारी न्यायालय सुरू राहणार आहे. राहुरी येथील वकील दाम्पत्याच्या खून खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

पहिल्या दिवशी सोमवारी अॅड. रामदास बाचकर याची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांनी अॅड. राजाराम आणि मनिषा आढाव यांना राहुरी न्यायालयात येताना पाहिले होते. राहुरी न्यायालयातील सीसीटीव्ही फुटेज बाचकर यांना सुनावणीच्या दरम्यान दाखवण्यात आले. त्यातील वकील दाम्पत्य व त्यांना भेटण्यासाठी आलेल्या आरोपींना बाचकर यांनी ओळखले, परंतु ते स्वतः एकाही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत नाहीत. त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. त्यानंतर, तिसऱ्या दिवशी बुधवारी भाऊराव तमनर यांची साक्ष नोंदवण्यात आली. त्यांची राहुरी न्यायालयात चहाची टपरी आहे. घटना घडली, त्या दिवशी अॅड. राजाराम आढाव यांच्या पत्नी मनिषा तमनर यांच्या टपरीवर आल्या होत्या. त्यांनी पाण्याची बाटली घेतली, परंतु पैसे द्यायचे विसरल्या होत्या. त्यामुळे त्या पैसे देण्यासाठी पुन्हा टपरीवर आल्या. त्यावेळी मॅडमने मी शुभम याच्यासोबत घरी चालले आहे, असे तमनर यांना दिली होती. तशी साक्ष तमनर यांनी दिली. त्यावर त्यांची उलटतपासणी घेण्यात आली. आतापर्यंत चार जणांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या आहेत. यातील माफीचा साक्षीदार असलेल्या हर्षल ढोकणे याने संपूर्ण घटनाक्रम सांगितला होता. इतर तिघांनी घटनेपूर्वी न्यायालयातील माहिती दिली असून, आरोपींना ओळखले आहे. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. उज्ज्वल निकम यांनी, तर आरोपींच्या वतीने अॅड. सतीश वाणी यांनी काम पाहिले.

 बाटलीवरुन शोध लागला 

घटनेच्या दिवशी वकील दाम्पत्य राहुरी न्यायालयात आले होते. यातील अॅड. मनिषा आढाव यांच्या हातात पाण्याची बाटली असल्याचे सीसीटीव्हीत दिसते. ही बाटली त्यांनी कुठून घेतली, हे मात्र स्पष्ट होते. त्यांनी पाण्याची बाटली चहाच्या टपरीवरून घेतली होती, अशी माहिती तमनर यांनी दिली. त्यावरून वकील मॅडम यांच्या हातात जी बाटली होती, ती त्यांनी चहाच्या टपरीवरून घेतली होती. पाण्याची बाटली घेताना त्यांचे चहावाल्याशी बोलणे झाले होते, हेही उघड झाले आहे. 

टॅग्स :RahuriराहुरीCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय