मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले, वांबोरी चारी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 12:03 IST2021-03-15T12:02:38+5:302021-03-15T12:03:24+5:30

मुळा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

As the radish leaves the cycle through the right canal, the Wambori Chari will continue | मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले, वांबोरी चारी सुरूच राहणार

मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले, वांबोरी चारी सुरूच राहणार

राहुरी : दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून सोमवारी सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पहिल्या टप्प्यात ७०० क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर दुसऱ्या टप्प्यात ९०० क्‍यूसेक तर तिसऱ्या टप्प्यात सोळाशे क्युसेसने पाणी सोडण्यात येणार आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात सध्या २० हजार ४५० दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. त्यापैकी जिवंत पाणीसाठा १५ हजार ९५० दशलक्ष घनफूट आहे.

मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून यापूर्वी २०० क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. याशिवाय वांबोरी चारीतून १५ फेब्रुवारीपासून बंधाऱ्यांसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. वांबोरी चारीचे आवर्तन आणखी महिनाभर चालणार असून एकशे दोन बंधारे पाण्याने भरण्यात येणार आहे, असेही आंधळे यांनी सांगितले.

 

Web Title: As the radish leaves the cycle through the right canal, the Wambori Chari will continue