शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटपेक्षा रस्त्यावर भाजीपाल्याचा भाव दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

------------ लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र ...

------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट भावाने मिळतो. त्यात मार्केट परिसरासह एकवीरा चौकात ग्राहकांना परवडणारे दर आहेत. चितळे रोड, प्रोफेसर चौक आदी परिसरात भाजीपाल्याचे दर जास्तच आहेत. फ्लावर, घोसाळे, कोबी, दोडका या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असली तरी या भाज्यांचा किरको‌ळ बाजारातील दर ४० ते ५० रुपये असा आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीला येतो. इथे पहाटेपासूनच भाजीपाल्यांचे, फळांचे लिलाव होतात. ठोक विक्रीसाठी इथे मोठी गर्दी होते. ठोक बाजारात स्वस्त किमतीत भाजीपाला मिळत असल्याने किरकोळ ग्राहकही बाजार समिती परिसरात गर्दी करतात. जुना मंगळवार बाजार, गाडगीळ पटांगण, एकवीरा चौक, चितळे रोड, भिस्तबाग आदी परिसरात बाजार भरतो. प्रत्येक ठिकाणी तीन ते चार रुपयांचा फरक असतो.

-----------

हा बघा फरक (प्रतिकिलो)

भाजी भाजी मार्केट घराजवळ

टोमॉटो १० २०

वांगी २० ४०

फ्लावर २० ४०

कोबी १० २०

काकडी १० ३०

गवार ६० १००

दोडका १० ४०

कारले २० ५०

भेंडी १५ ४०

मिरची २५ ५०

-----------------------

दोडका एकवीरा चौकात ४० रुपये, प्रोफेसर चौकात ६० रुपये

सध्या दोडका मोठ्या प्रमाणावर विक्रीस आला आहे. साधारणपणे मार्केटमध्ये १० रुपये किलो दोडका मिळतो. प्रोफेसर चौकात ६० ते ८० रुपये किलो, तर एकवीरा चौकात ४० रुपये किलो मिळतो. कोबी, फ्लावर या भाज्यांच्या दरातही कमालाची तफावत दिसते.

-------------

पिकवतात शेतकरी, माल मात्र जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी मोठ्या कष्टाने पालेभाजी पिकवतात. मात्र ते बाजार समितीमध्ये किरकोळ दरामध्ये विकतात. दुसरेच हा माल खरेदी करून किरकोळ बाजाराच दुप्पट ते तिप्पट दराने विकतात. शेतकऱ्यांऐवजी तिसऱ्यांच्याच हाती पैसा जातो. यामुळेच शेतकरी अधिक गरीब होत आहे, अशी प्रतिक्रिया निघोज येथील कृषीमित्र संकेत लाळगे यांनी दिली.

-------------

एवढा फरक कसा.....

पहाटे उठून बाजारात जातो. तिथे लिलावाद्वारे माल घेतो. या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहन भाड्याने असते. काहींचे वाहन स्वत:चे असले तरी पेट्रोल-़डिझेलचे दर वाढल्याने वाहनभाडे वाढलेले आहे. शिवाय दिवसभर रस्त्यावर बसावे लागते. त्यामुळे हा सर्व खर्च काढणेही शक्य नसते.

- भाजी विक्रेते, प्रोफेसर चौक

-------------

लॉकडाऊनमध्ये माझा रोजगार गेला आहे. त्यामुळे आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजी विकण्यासाठी दिवसभर एकाच जागेवर बसावे लागते. त्यात भाजी ताजी असताना विकली तर फायदा होतो. भाजी सुकली तर कमी भावाने द्यावी लागते. हा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा भरून काढण्यासाठी भाज्यांमध्ये दरवाढ होते.

-भाजी विक्रेते, एकवीरा चौक

-------------