पूर्णवाद अकादमीतर्फे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:19 IST2021-07-25T04:19:41+5:302021-07-25T04:19:41+5:30

पारनेर परिसर, तसेच तालुक्यातील गोरेगाव, कान्हूर पठार, कांजिवरे, वडझिरे आदी ठिकाणी अन्नदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी अकादमीचे ...

Plantation by Purnavad Academy | पूर्णवाद अकादमीतर्फे वृक्षारोपण

पूर्णवाद अकादमीतर्फे वृक्षारोपण

पारनेर परिसर, तसेच तालुक्यातील गोरेगाव, कान्हूर पठार, कांजिवरे, वडझिरे आदी ठिकाणी अन्नदान व वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. यासाठी अकादमीचे अध्यक्ष राहुल संत, रणजीत पाटील, सुरेंद्र रोडगे, गौरव पुरंदरे, निखिल शिंदे, मंगेश मोहिते, संतोष माळी, संतोष देसाई, गणेश गवळी, प्रशांत मुळे, विजय डोळ, अनुप शर्मा, प्रसाद ऋषी, डॉ. श्याम लोंढे यांनी परिश्रम घेतले. पूर्णवाद युवा फोरमचे संस्थापक लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबविण्यात आले. तसेच पारनेर तालुक्यात विविध ठिकाणी अन्नदानही करण्यात आले. गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आली. गोरेगाव येथील कार्यक्रमात सचिन नरसाळे, रणकंद यांच्या हस्ते गरजूंना अन्नाची पाकिटे वाटप करण्यात आपली. कान्हूर पठार येथील कार्यक्रमात गोकुळ घोडके, महेश घोडके यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

--------

फोटो- २४ पूर्णवाद युवक

पूर्णवाद परिवारातील युवकांनी पारनेर परिसरात वृक्षारोपण केले.

Web Title: Plantation by Purnavad Academy