कोळपेवाडी परिसरात पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST2021-06-29T04:15:18+5:302021-06-29T04:15:18+5:30

चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे. मात्र तो ढगफुटी सदृश पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस ...

Perform panchnama in Kolpewadi area | कोळपेवाडी परिसरात पंचनामे करा

कोळपेवाडी परिसरात पंचनामे करा

चालू हंगामातील हा पहिलाच पाऊस आहे. मात्र तो ढगफुटी सदृश पडून शेतीचे बांध, जनावरांसाठी चारा पिके, ऊस पिके, चाळीत साठवलेला कांदा, फळबागा, शेड यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे अनेक जण अडचणीत आलेले आहेत. त्यात ढगफुटीचे संकट या पाच गावातील रहिवासी व शेतकऱ्यांवर ओढावलेले आहे. त्यामुळे त्यांचे नुकसानीचे पंचनामे शासनाने तत्काळ करावेत, तहसीलदारांनी त्याची पाहणी करून योग्य स्वरूपाचा अहवाल तयार करावा अशा सूचना कोल्हे यांनी केल्या आहेत.

मागील हंगामाचा पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. तो देखील तत्काळ द्यावा, अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. तालुक्याच्या अन्य भागात अजून मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पेरणीची घाई करू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title: Perform panchnama in Kolpewadi area