शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

परमार्थ हा निष्काम सेवेचे प्रतिक

By admin | Updated: August 3, 2014 01:09 IST

संगमनेर : सर्वच गोष्टी स्वार्थासाठी करायच्या नसतात. निस्वार्थ भावनेने अंत:करणातून केलेला परमार्थ हा शुध्द व कल्याण करणारा असतो.

संगमनेर : सर्वच गोष्टी स्वार्थासाठी करायच्या नसतात. निस्वार्थ भावनेने अंत:करणातून केलेला परमार्थ हा शुध्द व कल्याण करणारा असतो. परमार्थ हा निष्काम सेवेचे प्रतिक आहे. म्हणून प्रत्येकाने सप्ताहाची सेवा निस्वार्थ भावनेने करावी, असे आवाहन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. श्रीक्षेत्र तळेगाव दिघे येथे १६७ व्या सद्गुरु गंगागिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहात प्रवचनाद्वारे उपदेश करताना ते बोलत होते. व्यासपीठावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ़ डॉ. सुधीर तांबे, डॉ. हर्षल तांबे, अनुराधा नागवडे, रणजित देशमुख आदी उपस्थित होते. रामगिरी महाराज म्हणाले, भगवंताची प्राप्तीसाठी दहा जन्म घालावे लागतात. परमार्थ करणाऱ्यांची संख्या मात्र कमी होत चालली आहे. पाप हे दृष्टीतून मनात येत असते. त्यासाठी दृष्टी स्वच्छ असणे आवश्यक असते. परमार्थ व साधना करताना संस्कार हे नेहमीच मनात येतात. कर्म, क्रोध व लोभ हे तीन विकार नरकाचे द्वार आहेत. मनुष्य विकाराच्या आधीन होत जातो. धर्मावर टीका करण्याचा अधिकार कुणालाच नाही. ज्याच्याकडे योग्यता आहे तोच शस्त्र व ग्रंथाचा अभ्यास करु शकतो. संत हे दुर्जनातील दुर्जनपणाच दूर करतात. दु:ख पचविल्याशिवाय सुख मिळत नाही, असेही ते म्हणाले. सप्ताह अविस्मरणीय होण्यासाठी गंगागिरी महाराज, नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांचे आशिर्वाद महत्वाचे असल्याचे सांगून भाविकांनी स्वच्छता राखावी, असे आवाहन थोरात यांनी केले. यावेळी भाऊसाहेब कुटे, बाळासाहेब गायकवाड, नवनाथ महाराज आंधळे, अविनाश सोनवणे, सचिन दिघे, सरपंच मीना इल्हे, आरती दिघे, अर्चना बालोडे, अजय फटांगरे, नवनाथ अरगडे, नामदेव दिघे, प्रभाकर कांदळकर, सतीश कानवडे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन नामदेव कहांडळ यांनी केले़ (प्रतिनिधी)