बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:29 IST2021-02-05T06:29:33+5:302021-02-05T06:29:33+5:30

याबाबत माहिती अशी की, शेतकरी गणेश सुपेकर हे मंगळवारी रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा ...

One injured in a leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

बिबट्याच्या हल्ल्यात एक जखमी

याबाबत माहिती अशी की, शेतकरी गणेश सुपेकर हे मंगळवारी रात्री आपल्या दुचाकीवरून घरी जात असताना त्याचवेळी रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर झेप घेत पंजा मारला. मात्र, अंगात स्वेटर असल्याने बिबट्याचे नखे हातावर ओरखडून जखमी झाले.

अकलापूर शिवारातील भोरमळा येथील शिवाजी सुदाम भोर यांच्या गोठ्यात पहाटेच्या वेळी बिबट्याने प्रवेश करत वासरावर हल्ला केला. भोर यांचा मुलगा वैभवने पाहताच आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान, पठारभागात दिवसेंदिवस बिबट्यांचे हल्ले वाढत असल्याचे यावरून अधोरेखित होत आहे. शेतकऱ्यांसह नागरिक बिबट्यांच्या दहशतीखाली राहत आहेत. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अनेक ठिकाणी पिंजरेही लावले असल्याचे वन परिमंडळ अधिकारी रामदास थेटे यांनी सांगितले.

Web Title: One injured in a leopard attack