संगमनेर वगळता इतर तालुक्यांत रुग्णसंख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:28+5:302021-08-27T04:25:28+5:30

अहमदनगर : संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे ...

The number of patients decreased in all the talukas except Sangamner | संगमनेर वगळता इतर तालुक्यांत रुग्णसंख्या घटली

संगमनेर वगळता इतर तालुक्यांत रुग्णसंख्या घटली

अहमदनगर : संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यात गुरुवारी ७०२ जण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी ८२३ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ८ हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५३ टक्के इतके झाले आहे. जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ७०२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार ५८६ इतकी झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही घटली आहे.

---

सक्रिय रुग्णांची संख्या

नगर शहर- १५५

अकोले -४९३

जामखेड-१२३

कर्जत-२६१

कोपरगाव-१०७

नगर ग्रामीण-२७७

नेवासा-२४२

पारनेर-५०७

पाथर्डी-२४७

राहाता-२२८

राहुरी-२०६

संगमनेर-९४३

शेवगाव-२२२

श्रीगोंदा-३९०

श्रीरामपूर-१०४

भिंगार-७

इतर जिल्हा-७४

--------

पाच दिवसांत ७४ मृत्यू

जिल्ह्यात पाच दिवसांमध्ये ७४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या दैनंदिन अहवालात नमूद करण्यात आली आहे. २२ ऑगस्टला १४, २३ ऑगस्टला २२, २४ ऑगस्टला १२, २५ ऑगस्टला १६, २६ ऑगस्टला १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ज्या् दिवशी पोर्टलवर नोंद झाली, त्यादिवशी तेवढी संख्या दिसते आहे, याचा अर्थ त्या त्या दिवशी तेवढे मृत्यू झाले असे नाही, असे आरोग्य यंत्रणेने सष्ट केले आहे.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्ण संख्या : ३,०८,२६४

उपचार सुरू असलेले रुग्ण : ४५८६

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६४९५

एकूण रुग्ण संख्या : ३,१९,३४५

Web Title: The number of patients decreased in all the talukas except Sangamner