येथे कोणी येऊही नये आणि वाहनेही लावू नये..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:19 IST2021-04-16T04:19:58+5:302021-04-16T04:19:58+5:30

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील एका वस्तीवरील बोर्ड (फलक) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ...

No one should come here and no vehicles should be parked. | येथे कोणी येऊही नये आणि वाहनेही लावू नये..

येथे कोणी येऊही नये आणि वाहनेही लावू नये..

पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील एका वस्तीवरील बोर्ड (फलक) सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘येथे कोणी येऊही नये आणि वाहनेही लावू नयेत...’ असा बोर्ड एका वस्तीवर एका मुलीने लावला आहे.

येथील वडगाव गुप्ता-एमआयडीसी रस्त्याच्या कडेलाच सुदाम ज्ञानदेव गुंड यांची वस्ती आहे. त्या ठिकाणी दाट झाडांची सावली व पत्र्याचे शेड असल्यामुळे बरेचसे कामगार व शेतमजूर येथे वाहने लावतात व घटकाभर विश्रांती घेतात. परंतु, सध्या कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे कोरोना प्रसार होऊ नये यासाठी सुदाम गुंड यांची इयत्ता पाचवीतील मुलगी धनश्री गुंड हिने येथे एका मोठ्या बोर्डवर आवाहन केले आहे. कोरोना असल्याने काळजी घ्या. येथे कोणी येऊही नये आणि येथे वाहनेही लावू नये. एकत्रित वाहने पार्किंग करू नये, असे आवाहन तिने केले आहे.

--

१५ पिंपळगाव माळवी

पिंपळगाव माळवी येथील धनश्री गुंड हिने तयार केलेला फलक.

Web Title: No one should come here and no vehicles should be parked.