मोनिका राजळेंनी घेतली आराेग्यमंत्र्यांची मुंबईत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:49+5:302021-08-22T04:25:49+5:30

पाथर्डी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी मुंबई येथे आरोग्य व ...

Monica Rajale meets Health Minister in Mumbai | मोनिका राजळेंनी घेतली आराेग्यमंत्र्यांची मुंबईत भेट

मोनिका राजळेंनी घेतली आराेग्यमंत्र्यांची मुंबईत भेट

पाथर्डी : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पार्श्वभूमीवर संभाव्य धोका लक्षात घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी मुंबई येथे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती देऊन आरोग्य सुविधा व उपाययोजनांबाबत चर्चा केली.

पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात नवीन पन्नास बेड मंजूर करावेत, रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करावे (दर्जा वाढविणे), ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे नवीन पन्नास बेड मंजूर करावेत, तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करावे, पाथर्डीचे उपजिल्हा रुग्णालय, शेवगावचे ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे व्हेंटिलेटरची संख्या व ऑक्सिजन प्लांटची क्षमता वाढवावे, आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.

-----

२१राजळे-टोपे

मुंबई येथे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची आमदार मोनिका राजळे यांनी भेट घेतली.

Web Title: Monica Rajale meets Health Minister in Mumbai