शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही आमदारांकडून निवडणूक आल्यावर विकासकामांच्या गप्पा; राम शिंदे-रोहित पवारांवर सुनील शेळकेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 16:52 IST

आमदार सुनील शेळके यांची राम शिंदे-रोहित पवार यांच्यावर टीका

Sunil Shelke: आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत जामखेड शहराच्या पाणी, रस्ते आणि औद्योगिक विकासाच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्टार प्रचारक आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दोन्ही नेत्यांचे नाव न घेता, "निवडणूक आली की दोन्ही आमदार तळ ठोकून बसतात आणि विकासाच्या गप्पा मारतात," असा टोला शेळके यांनी लगावला.

जामखेड नगरपरिषद निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आमदार शेळके यांनी जामखेड शहरातील समस्यांवर बोट ठेवत, दोन्ही आमदारांच्या कार्यकाळात विकासाची कामे झाली नसल्याचे स्पष्ट केले. "माजी आणि विद्यमान अशा दोन्ही आमदारांच्या दोन टर्म शहरात झाल्या आहेत. तरीही शहराला आठ दिवसांतून एकदा पाणी मिळते, रस्त्यांची कामे अर्धवट आहेत आणि शहर धुळीने माखलेले आहे. शहराच्या आर्थिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या स्थापनेलाही खोडा घालण्यात आला आहे. विकासकामांपेक्षा श्रेयवादाची लढाई या दोन नेत्यांमध्ये अधिक झाली, ज्यामुळे शहराचे नुकसान झाले," अशी टीका त्यांनी केली.

निवडणूक जवळ आली की हे दोन्ही नेते जामखेडमध्ये तळ ठोकून बसतात आणि मग विकासाचे स्वप्न दाखवतात. जनतेने आता त्यांच्या या गप्पांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सभेला उपस्थित असलेल्या अन्य नेत्यांनीही दोन्ही आमदारांवर जोरदार टीकास्त्र सोडले. कल्याण आखाडे म्हणाले की, "दोन आमदार असूनही जामखेडची स्थिती भकास आहे. निवडणुकीत जनता जर अरबी समुद्र द्या किंवा आकाशातील तारे द्या असे म्हणाले, तरी हे लगेच ते देण्याची तयारी दाखवतील. दोन्ही आमदार फक्त जनतेची दिशाभूल करत आहेत."

महेश निमोणकर यांनी कोविड काळातील स्थिती आठवण करून दिली. "कोरोनाच्या कठीण काळात एका आमदाराने टँकरचे पाणी बंद केले, तर दुसरा घरासमोरील झाडांना पाणी देत होता. हे सर्व जामखेडच्या जनतेने पाहिले आहे," असे निमोणकर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shelke Slams MLAs for Empty Promises Before Jamkhed Election

Web Summary : Sunil Shelke criticized Ram Shinde and Rohit Pawar for neglecting Jamkhed's development. He accused them of making false promises during elections, pointing to water scarcity, incomplete roads, and stalled industrial development. Other leaders echoed Shelke's sentiments, highlighting alleged misleading tactics.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024karjat-jamkhed-acकर्जत-जामखेडRam Shindeराम शिंदेRohit Pawarरोहित पवार