उसाच्या शेतातील जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:14+5:302021-09-18T04:23:14+5:30
खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे उसाच्या शेतामध्ये एक छोटी झोपडी तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर ...

उसाच्या शेतातील जुगार अड्ड्यावर मध्यरात्री छापा
खर्डा (जि. अहमदनगर) : जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे उसाच्या शेतामध्ये एक छोटी झोपडी तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर शुक्रवारी (दि.१७) मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. यावेळी १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी १ लाख ६ हजारांची रोकड, एक कार, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील एका उसाच्या शेतात एक छोटी झोपडी बनवून त्यामध्ये पैशांवर तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती जामखेड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात, पोलीस नाईक अविनाश ढेरे, पोलीस नाईक संभाजी शेंडे, पोलीस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, विजय कोळी, अरुण पवार, संदीप आजबे, बिराजदार धनराज यांच्या पथकाने शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास वंजारवाडी येथील उसाच्या शेतात सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर छापा टाकला.
यावेळी दादा लक्ष्मण इपार (रा. वंजारवाडी), बाळासाहेब हरिभाऊ साठे (रा. जवळके), घनश्याम कैलास डोके (रा. खर्डा), हनुमंत उत्तम देवकर (रा. रत्नापूर, ता. परांडा), अजय बबन साठे (रा. रत्नापूर, ता. परांडा) राजेंद्र उद्धव डहाळे (रा. तरडगाव), रामा जानू आव्हाड, महादेव लक्ष्मण शेतकर, संभाजी सीताराम कराड, संदीप भीमा भोसले (रा. वंजारवाडी), हर्षद नजमो शेख, महेश शहाजी काळे (रा. धनेगाव), किरण मुकुंद गोलेकर, प्रकाश रामकृष्ण गोलेकर, योगेश अण्णा सुरवसे (रा. खर्डा) यांना जुगार खेळताना पकडण्यात आले. यावेळी १ लाख ६ हजारांची रोकड, एक कार, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.