शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

आघाडीचे सरकार टाइमपास सरकार : राम शिंदे यांचे टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 15:41 IST

राज्यात असलेले तीन पक्षांचे आघाडी सरकार कुचकामी असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप होऊ देणार आहे, असा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला.

अहमदनगर : राज्यात असलेले तीन पक्षांचे आघाडी सरकार कुचकामी असून त्यांच्या नाकर्तेपणामुळे मराठा, ओबीसी समाजाचे आरक्षण धोक्यात आले. जोपर्यंत ओबीसींचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप होऊ देणार आहे, असा इशारा माजी मंत्री राम शिंदे यांनी दिला.

आघाडी सरकारच्या विरोधात भाजपच्या वतीने शनिवारी नगर-पुणे महामार्गावर सक्कर चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यावेळी शिंदे यांच्यासह खासदार सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, जेष्ठ नेते अभय आगरकर, वसंत लोढा, सुवेंद्र गांधी, अक्षय कर्डिले, नगर तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, अभिलाष घिगे , संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, रेवणनाथ चोभे , शिवाजी कार्ले, हरिभाऊ कर्डीले,  श्याम पिंपळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

राम शिंदे म्हणाले की, राज्य सरकार सर्व आघाड्यांवर फेल होत आहे. राज्य सरकारने योग्य बाजू न मांडल्याने मराठ्यांचे आरक्षण रद्द झाले. ओबीसींच्या राजकीय आरक्षण धोक्यात आले, तसेच मागासवर्गीयांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले. त्याचे सरकारला गांभीर्य नाही. जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत राज्यात कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. समाज त्यासाठी रस्त्यावर उतरेल, अशी टीका शिंदे यांनी केली.

सुजय विखे म्हणाले की, आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर आंदोलन सुरू आहे. कोरोनाच्या काळात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात झाले. मराठा, ओबीसींचे आरक्षण हे सरकार टिकू शकले नाही. म्हणून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. सरकारने योग्य मांडणी करून आरक्षणाबाबत ठोस पाऊल उचलले नाही तर येत्या काळात यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

शिवाजी कर्डिले यांनी आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. सरकारने निवडणुकांबाबत आपला निर्णय बदलला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाRam Shindeराम शिंदेcongressकाँग्रेस