गेल्या तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा ओढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:03+5:302021-09-18T04:23:03+5:30

अहमदनगर : गेल्या तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनकडे (पाॅलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी एकूण क्षमतेच्या ...

The influx of students towards Tantraniketan for the last three years | गेल्या तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा ओढा

गेल्या तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनकडे विद्यार्थ्यांचा ओढा

अहमदनगर : गेल्या तीन वर्षांपासून तंत्रनिकेतनकडे (पाॅलिटेक्निक) विद्यार्थ्यांचा ओढा वाढताना दिसत आहे. नगर जिल्ह्यात मागील तीन वर्षांपूर्वी एकूण क्षमतेच्या ३५ टक्केच जागा भरल्या होत्या. दरवर्षी त्या वाढत मागील वर्षी ५० व यंदा त्या ६० टक्के भरण्याची शक्यता आहे. कारण, यंदा मागील वर्षीपेक्षा १ हजार अर्ज जास्त आले आहेत.

रोजगाराभिमुख शिक्षण मिळावे म्हणून विद्यार्थी अभियांत्रिकीकडे वळतात. परंतु, मागील दहा-पंधरा वर्षांत तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालयांचे मोठे पीक आले. परिणामी त्या तुलनेत विद्यार्थ्यांचे प्रवेश होईनात. त्यामुळे अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांविना बंद पडली. परंंतु, गेल्या काही वर्षांपासून तंत्रनिकेतन पदविका, अभियांत्रिकीच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांत पुन्हा पसंती मिळत आहे.

नगर जिल्ह्यात १ शासकीय व २७ खासगी असे एकूण २८ तंत्रनिकेतन महाविद्यालये असून, त्यात ७५०० जागा आहेत. तीन वर्षांपूर्वी या महाविद्यालयांच्या एकूण जागांपैकी केवळ ३५ टक्के जागा भरल्या. त्यानंतर दुसऱ्या वर्षी ४५ व मागील वर्षी ५० टक्के जागा भरल्या. मागील वर्षी ३८०० जागा भरल्या होत्या. यंदा ऑनलाईन पर्याय नोंदविण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर आहे. दरम्यान, यंदा जिल्ह्यात एकूण ४८०० अर्ज आलेले आहेत. एकूण जागांच्या ७० टक्के जागा नगर जिल्ह्यासाठी, तर ३० टक्के जागा इतर जिल्ह्यांसाठी राखीव आहेत. आलेले ४८०० अर्ज ७० टक्के जागांसाठी आहेत. ३० टक्के जागांसाठी इतर जिल्ह्यांतून आलेल्या अर्जांतून भरल्या जातील. म्हणजे प्रवेशावेळी आणखी जागा भरलेल्या दिसणार आहेत.

----------

शासकीयसह तीन-चार तंत्रनिकेतनला ९० टक्के प्रवेश

विद्यार्थ्यांची पहिली पसंती शासकीय तंत्रनिकेतनला असते. त्यानंतर जिल्ह्यातील काही नामवंत खासगी महाविद्यालयांना पसंती मिळते. या महाविद्यालयात दरवर्षी ९० टक्केच्या पुढे प्रवेश होतात.

-----------------

केंद्रिभूत प्रवेश प्रक्रिया फेरी १ चे वेळापत्रक

- पहिल्या फेरीसाठी उमेदवाराने ऑनलाईन विकल्प नमुना भरणे व त्यास निश्चित करणे- १३ ते १६ सप्टेंबर

- पहिल्या फेरीसाठी तात्पुरती जागा वाटप प्रदर्शित करणे - १८ सप्टेंबर

- पहिल्या फेरीसाठी जागा वाटप करण्यात आलेल्या जागेची उमेदवारांनी स्वीकृती करणे - १९ ते २२ सप्टेंबर

- जागा वाटप झालेल्या संस्थेमध्ये उपस्थित राहणे आणि आवश्यक कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेशाची निश्चिती करणे- १९ ते २३ सप्टेंबर

जर वेळापत्रकात बदल झाला तर https://polyusers21.dtemaharashtra.gov.in या संकेत स्थळावर पहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

-------------

जिल्ह्यातील प्रवेशक्षमता - ७५००

एकूण पॉलिटेक्निक महाविद्यालये - २८

प्रवेश अर्ज - ४८००

शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालये - ०१

शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - ५२०

खासगी महाविद्यालये कॉलेज - २७

खासगी पॉलिटेक्निक महाविद्यालय प्रवेश क्षमता - ६९८०

--------------

संगणक, मेकॅनिक, सिव्हिलकडे ओढा

विद्यार्थी तंत्रनिकेतनला प्रवेश घेताना संगणक, मेकॅनिक, तसेच सिव्हिल या शाखांना पसंती देत आहेत. गेल्या दोन वर्षांत ऑनलाईन, डिजिटलचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे तंत्रनिकेतनला पसंती मिळत आहे.

------------

मागील तीन वर्षांपासून सलग तंत्रनिकेतनच्या प्रवेशामध्ये वाढ होत आहे. मागच्या वर्षी ३८८६ जागा भरल्या होत्या. यावर्षी त्यापेक्षा १ हजार अर्ज जास्त आले आहेत. त्यामुळे यंदाही प्रवेश ५५ ते ६० टक्के होतील.

- मुकुंद सातारकर, प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन

Web Title: The influx of students towards Tantraniketan for the last three years