शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

... अन् जीवाच्या आकांताने गुरुजी पळाले; राहुरीत शाळाबाह्य मुलाने केला कोयता घेऊन पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 17:31 IST

शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लागला अन् या गुरुजीवर जीवाच्या आकांताने पळ काढण्याची वेळ आली.

राहुरी : शिक्षकांवर असलेल्या अनेक जबाबदा-यांपैकी एक असलेली जबाबदारी म्हणजे शाळाबाह्य मुलांचा शोध घेणे.. राहुरीतील एक शिक्षक आरडगाव येथे उसाच्या शेतात जाऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करीत होते. त्याचवेळी एक शाळाबाह्य मुलगा कोयता घेऊन त्या शिक्षकाच्या मागे लागला अन् या गुरुजीवर जीवाच्या आकांताने पळ काढण्याची वेळ आली. ही घटना सोमवारी घडली.ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यामुळे राहुरी तालुक्यातील ऊस पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बाहेरून कुटुंबे येऊन स्थिरावली आहेत. ऊसतोडणी मजुरांची अनेक मुले शाळाबाह्य असतात. त्यांना शाळेत आणले पाहिजे, या विचाराने जिल्हा परिषदेच्या आरडगाव येथील शाळेतील शिक्षक राजू उदमले हे सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ऊसतोडणी कामगारांच्या कोप्यावर गेले. तेथे शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊ लागले. कुणी शाळाबाह्य मुले आहेत का? याची चौकशी त्यांनी तेथे केली. त्यानंतर एक मुलगा शाळाबाह्य असल्याचे त्यांना सांगण्यात आले. गेवराई येथील ऊसतोडणी कामगाराचे हे कुटुंब होते. मुलाला शाळेत पाठविण्याची विनंती राजू उदमले हे त्या ऊसतोडणी कुटुंबाला करीत होते. त्याचवेळी त्या शाळाबाह्य मुलाने एक मोठा दगड त्या राजू उदमले यांना मारण्यासाठी उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु त्या मुलाच्या आईने त्याला रोखले़ दगड उचलू दिला नाही. त्याकडे दुर्लक्ष करीत राजू उदमले यांनी त्या शाळाबाह्य मुलास शाळेचे महत्त्व समजावून सांगत शाळेत येण्याची सूचना केली. मात्र, त्या मुलाने आपल्या झोपडीकडे धाव घेत झोपडीतून कोयता आणला. तो आपल्याच दिशेने पळत येत आहे, हे लक्षात येताच शिक्षक राजू उदमले हे तेथून पळू लागले. ते पाहून तो मुलगाही उदमले यांच्या पाठीमागे पळू लागला. हे दृश्य पाहून तेथील काही लोकांनी त्या मुलाला पकडले अन् राजू उदमले या शाळाबाह्य मुलाच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावले.एकही मुलगा शाळाबाह्य राहू नये, यासाठी घरोघर फिरून पाय दमवणा-या शिक्षकांना पायात गोळे येईपर्यंत पळावे लागू शकते, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण जीवावर बेतू शकते, याची प्रचिती सोमवारी राजू उदमले यांना आली. या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSchoolशाळाTeacherशिक्षक