शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
3
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
4
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
5
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
6
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
7
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
8
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
9
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
10
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
13
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
14
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
15
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
16
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
17
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
18
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
19
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
20
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

चारचाकी वाहन विहिरीत पडून चार जणांचा मृत्यू, जामखेड शहराजवळील अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 21:31 IST

दुरुस्ती सुरू असलेल्या रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटले

जामखेड (जि. अहिल्यानगर) : जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी येथे चार चाकी वाहन (बोलेरो) रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले. वाहन पाण्यात बुडाल्याने वाहनातील चार युवकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १५) सायंकाळी साडेचार वाजता घडली.

जामखेड नगरपरिषद हद्दीतील जामवाडी-जामखेड या रस्त्याने दुपारी साडेचार वाजता बोलेरो या चारचाकी वाहनाने रामहरी गंगाधर शेळके, अशोक विठ्ठल शेळके, किशोर मोहन पवार, चक्रपाणी सुनील बारस्कर येत होते. रस्त्याचे काम चालू असल्याने त्यावर खडी टाकलेली होती. वाहनचालकाला रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी चारचाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पडले. सदर घटना रस्त्यावर काम करणाऱ्या लोकांनी पाहिली. त्यांनी त्वरीत जामवाडी येथील ग्रामस्थांना बोलावले.विहिरीला कठडे, पायऱ्या नव्हत्या

सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन करून सांगितले. माजी सरपंच कैलास माने, रमेश आजबे यांनी कठडा व पायऱ्या नसलेल्या या विहिरीत दोरखंड लावून काही युवकांना उतरवले. त्यांनी बुडालेल्या चारही युवकांना विहिरीतून बाहेर काढले. यावेळी मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी असलेली गर्दी हटवली. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी व समर्थ हॉस्पिटलच्या रूग्णवाहिकेने चारही जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे चारही मृतदेह शवविच्छेदन गृहात शवविच्छेदनसाठी आणण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा पर्यंत शवविच्छेदन चालू होते.

टॅग्स :Accidentअपघात