शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच पंचरंगी लढत

By admin | Updated: September 30, 2014 01:29 IST

संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून

संगमनेर : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजतागायत संगमनेरच्या १५ विधानसभा निवडणुका दुरंगी किंवा तिरंगी झाल्या. आता मात्र चित्र उलट दिसणार असून १६ वी निवडणूक पंचरंगी होत असल्याने राजकीय इतिहासात महत्वपूर्ण ठरणार आहे. संगमनेर तालुका हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहीला. १९३७ साली कम्युनिस्ट पक्षाकडून के.बी. दादा देशमुख हे निवडणूक जिंकून संगमनेर तालुक्याचे पहिले आमदार झाले. त्यांनी ल.मा. पाटील, काकासाहेब गरूड यांच्याशी तिरंगी लढत दिली. त्यानंतर १९४६ साली कॉ. दत्ता देशमुख कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आले. त्यांनाही तिरंगी लढत द्यावी लागली. परंतु स्वातंत्र्य चळवळींमुळे कॉ. देशमुख यांना तुरूंगवास झाला. ते तुरूंगात असताना १० महिने बाजीराव कोते आमदार होते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ‘असेंब्ली इलेक्शन’ ऐवजी ‘विधानसभा निवडणुका’ हा शब्द प्रचलित झाला. १९५२ सालच्या तिरंगी निवडणुकीत कॉ. देशमुख यांनी कामगार किसान पक्षाचे लोकप्रतिनिधीत्व करून बी.जे. खताळ(काँग्रेस) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९५७ ची दुरंगी निवडणूक कॉ. देशमुख आणि सरदार थोरात(काँग्रेस) यांच्यात झाली. त्यात कॉ. देशमुख यांनी विजयश्री मिळविली. मात्र १९६२ ची निवडणूक बी.जे. खताळ(काँग्रेस), कॉ. दत्ता देशमुख(लाल निशाण पक्ष) व भास्करराव दुर्वे(समाजवादी) अशी तिरंगी झाली. त्यात खताळ(काँग्रेस) प्रथमच विजयी झाले. १९६७ सालच्या दुरंगी लढतीत भास्करराव दुर्वे(समाजवादी) यांना पराभूत करून पुन्हा खताळ विजयी झाले. १९७२ ला पुन्हा दुरंगी लढतीत खताळ (काँग्रेस) यांनी मोहनराव गाडे(समाजवादी) यांना पराभूत केले. १९७८ साली भाऊसाहेब थोरात यांनी दुरंगी लढत करून खताळ(म.स.कॉ.) यांचा पराभव केला. १९८० सालच्या दुरंगी लढतीत खताळ(काँग्रेस) यांच्याकडून संभाजी थोरात यांना पराभव पत्कारावा लागला. १९८५ साली दुरंगी निवडणूक झाली. आयात उमेदवार शकुंतला थोरात(काँग्रेस) यांना तिकीट देण्यात आले. त्यांना बाळासाहेब थोरात(अपक्ष) यांनी पराभूत करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. १९९० साली दुरंगी लढतीत थोरात यांनी वसंतराव गुंजाळ(भारतीय जनता पक्ष), १९९५ साली बापूसाहेब गुळवे(अपक्ष), १९९९ साली बापूसाहेब गुळवे(शिवसेना), २००४ साली संभाजी थोरात(शिवसेना), २००९ साली बाबासाहेब कुटे(शिवसेना) यांना पराभूत केले. १९९० ते २००९ अशा पाचही निवडणुका दुरंगी झाल्या आहेत. पण, २०१४ सालच्या या निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप-मित्रपक्षांची महायुती दुभंगल्याने चित्र एकदम पालटून गेले. प्रत्येक पक्षाकडून उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने राज्यासह संगमनेर तालुक्यात प्रथमत: पंचरंगी लढती होत आहेत. (प्रतिनिधी)