शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अनागोंदीला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

By admin | Updated: April 30, 2017 16:32 IST

वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दाढ बुद्रूक येथील तरुण शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़

आॅनलाइन लोकमतआश्वी (अहमदनगर), दि़ ३० - महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराला कंटाळून दाढ बुद्रूक येथील तरुण शेतकऱ्याने वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़दाढ बुद्रूक (ता़ राहता) परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ तीन दिवसांपासून रात्री व दिवसाही वीज पुरवठा खंडित होत आहे़ त्यामुळे पाणी असूनही पिके जळू लागली आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली़ शनिवारी रात्रभर वीज पुरवठा वारंवार खंडित होत होता़ त्यामुळे रविवारी सकाळी दाढ बुद्रूक येथील वीज वितरणच्या कार्यालयात जाऊन सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी करणाऱ्या विजय कोतकर या शेतकऱ्याला महावितरणच्या अनागोंदीचा मनस्ताप सहन करावा लागला़ त्यामुळे कोतकर यांनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला़ यावेळी तेथेच उभ्या असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याने कोतकर यांच्या हातातील काडेपेटी हिसकावून घेतली़ त्यामुळे पुढील अनर्थ टळला़ या घटनेची माहिती समजताच डॉ़ दिपक तांबे, भारत तांबे, देवीचंद तांबे, अस्लम शेख, अनिल तांबे, सुभाष तांबे, सचिन तांबे आदी तात्काळ सबस्टेशनमध्ये दाखल झाले़गेल्या वर्षी दुष्काळामुळे पिके जळाली़ ते कर्ज डोक्यावर असताना या वर्षी नवीन कर्ज घेऊन पिक उभे केले़ पाणी असूनही वीजेअभावी पिके जळू लागली़ त्यामुळे जगावे की मरावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेले शेतकरी विजय कोतकर यांनी सांगितले़