पैसे दुप्पट करणारी टोळी गजाआड

By Admin | Updated: June 17, 2016 23:36 IST2016-06-17T23:32:18+5:302016-06-17T23:36:10+5:30

अहमदनगर : पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात सुपा पोलिसांना यश आले असून, इतर तिघे साथीदार फरार झाले आहेत़

Doubling gang double the money | पैसे दुप्पट करणारी टोळी गजाआड

पैसे दुप्पट करणारी टोळी गजाआड

अहमदनगर : पैसे दुप्पट करून देणाऱ्या टोळीतील तिघांना जेरबंद करण्यात सुपा पोलिसांना यश आले असून, इतर तिघे साथीदार फरार झाले आहेत़ या तिघा आरोपींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे़
राजेंद्र राजाराम चव्हाण (वय-४३, रा़ महंमदवाडी, पुणे), मंगेश देवजी पटेल (वय-४५ रा़ मालवाड, मुंबई),कल्पतरू मिश्रा (वय-४५ रा़ ताडीवाला रोड, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ या तिघांनी दिव्य दिवा घेतल्यानंतर पैशांत दुप्पट वाढ होते, असे आमिष दाखवून पारनेर तालुक्यातील ते विसापूरकडे जाणाऱ्या म्हसणे फाटाजवळ वाघोली येथील बाळकृष्ण सिताराम येंडे व प्रशांत रमेश पिल्ले यांना पंधरा दिवसांपूर्वी पटेल याने नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे एक दिवा आहे़ तो दिवा घेतल्यास पैसे दुप्पट होतात़ दिव्याचे लाख व तपासणीकरिता १ लाख ५० हजार रुपये घेवून कुकाणा येथे बोलविले़ मात्र दिवा न देता पुणे येथील तिघा मित्रांची २१ लाख रुपयांची फसवणूक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी करत आहेत़

Web Title: Doubling gang double the money