तोफखाना येथे महाप्रसादाचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:25 IST2021-08-27T04:25:30+5:302021-08-27T04:25:30+5:30
..... स्मार्ट एलईडी प्रकल्प मंजुरीसाठी आयुक्तांकडे अहमदनगर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या ठेकेदार संस्थेसोबत गुरुवारी वाटाघाटी करण्यात आल्या. ...

तोफखाना येथे महाप्रसादाचे वाटप
.....
स्मार्ट एलईडी प्रकल्प मंजुरीसाठी आयुक्तांकडे
अहमदनगर : महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट एलईडी प्रकल्पाच्या ठेकेदार संस्थेसोबत गुरुवारी वाटाघाटी करण्यात आल्या. ठेकेदार संस्थेने एलईडी प्रकल्पाचे काम करण्याची तयारी ठेेकेदाराने दर्शविली आहे. त्यामुळे हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
.....
पावसाच्या हलक्या सरी
अहमदनगर : शहरासह उपनगरांत गुरुवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. दिवसभर कमालीचा उकाडा होता. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे वातावरणातील गारवा वाढला आहे.
......
रिमांड होम येथे आधारकार्ड वाटप
अहमदनगर : रिमांड होममधील बालकांचे आधारकार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. मोहिमेचे उद्घाटन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या सचिव रेवती देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. भूषण बऱ्हाटे, मुलींच्या निरीक्षण गृहाच्या उपअधीक्षिका पौर्णिमा माने, जिल्हा प्रकल्प अधिकारी महेश गोले, विधी स्वयंसेवक गणेश धाकपाडे, ॲड. अनुराधा येवले, सुनील तोडकर आदी उपस्थित होते.
.....