अनुसयानगरमध्ये नागरिकांनी बसविले सीसीटीव्ही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:16+5:302021-09-18T04:23:16+5:30
अहमदनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सीसीटीव्ही बसविण्यासाठी नागरिक पुढे येत असून, कल्याण रोडवरील अनुसयानगरमध्ये नागरिकांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविले. ॲड. ...

अनुसयानगरमध्ये नागरिकांनी बसविले सीसीटीव्ही
अहमदनगर : शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे सीसीटीव्ही बसविण्यासाठी नागरिक पुढे येत असून, कल्याण रोडवरील अनुसयानगरमध्ये नागरिकांनी स्वखर्चाने सीसीटीव्ही बसविले.
ॲड. युवराज शिंदे व अनुसयानगर परिसरातील नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. यावेळी ॲड. युवराज शिंदे, लक्ष्मण खोडदे, मच्छिंद्र साळवे, संभाजी चौधरी, शिवाजी शिंदे, महेंद्र मैड, भारत जावळे, सचिन हरबा, पोपट चव्हाण, सुधाकर बोल्ली, अमरसिंग परदेशी, कुंडलिक आरबडे, सर्जेराव भापकर, अकबर मनियार, मेजर रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले की, या भागाचा झपाट्याने विस्तार होत आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोऱ्या घरफोड्यांना आळा बसण्यास मदत होईल. महिलांचे मंगळसूत्र ओढणे, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले असून, सीसीटीव्हीमुळे या पुढील काळात चोरीच्या घटना घडणार नाहीत, असे शिंदे यांनी सांगितले.
...
सूचना फोटो: १७ शिंदे नावाने आहे.