शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धीसह आत्म्यात होतो बदल

By admin | Updated: July 21, 2016 23:57 IST

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़

राहाता: वीणा वाजवण्या करीता ज्याप्रमाणे तारा समतोल असाव्या लागतात, त्याप्रमाणे जीवनासाठी समतोल आहार आवश्यक आहे़ शरीर व मनाने समतोल राखला तर आत्म्याचा शोध घेता येतो़ मन परिवर्तनाचा बुध्दीला व आत्म्याला बदलवणारा संस्काराचा हा चतुर्मास असल्याचे मत साध्वी प्रीतिसुधाजी म़सा़ यांनी व्यक्त केले़राहाता येथे साध्वी प्रीतिसुधाजी शैक्षणिक संकुलात आयोजित ज्ञान संस्कार चतुर्मास निमित्त त्या बोलत होत्या़ प्रवचन देताना पुढे त्या म्हणाल्या, तत्वशून्य राजकारण, श्रमशून्य सम्पत्ती, चरित्र शून्य जीवन व मानवताशून्य विज्ञान या मुळे अनागोंदी व अनास्था निर्माण होते़ जीवनात पहिले सुख निरोगी काया आहे़ घरात माया असेल तर घरातील नारी सुशिल होते़ आज्ञाकारी गृहिणीमुळे घरात स्वर्गा सारखी शांतता निर्माण होते़अत्यंत खादाडपणा हे असंस्कृत पणाचे लक्षण आहे़ अन्नातून ऊर्जा, ऊर्जेतून बुध्दी व बुध्दीतून ध्येय प्राप्ती मिळते़ आहार साधा व सकस हवा़ स्वास्थ सांभाळणे बुध्दीवंताचे लक्षण आहे़ निसर्गाने आपल्याला भरपूर दिले आहे़ त्या मुळे आपण खूप श्रीमंत आहोत़ संस्कार बाजारात विकत मिळत नाही तर ते घडवून घ्यावे लागतात़लोखंडाचा तुकडा लोहाराकडे नेला व त्याची घोड्याची नाल बनवली तर त्याचे बाजारात हजार रुपये येतात, तोच तुकडा कारखानदाराकडे दिला तर त्याच्या सुया बनवून त्याची किंमत पाच हजार रुपये होते, तोच तुकडा घड्याळ कंपनीच्या मालकाकडे दिला तर त्याची किंमत २५ हजार रुपये होते, या प्रमाणे माणसावर संस्कार झाले तर मनुष्य अनमोल बनतो़ असा उपदेश साध्वी प्रीतिसुधाजी यांनी केला़ पुणे येथील सुभाषराव पिपाडा, शिर्डीचे संघपती पृथ्वीराज लोढा, ललिताताई बांठीया, लुधियाना येथील गणेशभाई, अंमळनेर येथील पाटील या सर्वांचे प्रीतिसुधाजी संकुलाचे अध्यक्ष इंद्रभान डांगे, प्राचार्य ज्ञानेश डांगे, पुनम डांगे, भगवान डांगे यांनी स्वागत केले. राजेश भन्साळी, बाबुशेठ पिपाडा, रमेश सांड, प्रविण जैन यांच्यासह जैन अजैन श्रावक उपस्थित होते .(वार्ताहर)