भिंगारकरांचा गणरायांना उत्साहात निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:23 IST2021-09-18T04:23:07+5:302021-09-18T04:23:07+5:30

भिंगारमध्ये यंदा १३ मोठ्या सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर तीन वाहनांच्या माध्यमातून सार्वजनिक तसेच घराघरातील ...

Bhingarkar bids farewell to Ganarayana | भिंगारकरांचा गणरायांना उत्साहात निरोप

भिंगारकरांचा गणरायांना उत्साहात निरोप

भिंगारमध्ये यंदा १३ मोठ्या सार्वजनिक मंडळांनी श्रींची प्रतिष्ठापना केली होती. पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर तीन वाहनांच्या माध्यमातून सार्वजनिक तसेच घराघरातील गणेश मूर्तींचे संकलन करून शुक्लेश्वर मंदिराजवळील विहिरीमध्ये विसर्जन केले. काही मंडळांनी स्वत:च्या वाहनातून मूर्ती विसर्जनासाठी आणल्या होत्या. विसर्जनादम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाच अधिकारी, १०० पोलीस कर्मचारी व राज्य राखीव दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शहरात कुठेही गर्दी होणार नाही याची पोलिसांनी दक्षता घेतली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे सकाळपासून बंदोबस्तावर लक्ष ठेवून होते.

-------------

उत्सव साधेपणाने साजरा

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या नियमांचे पालन करत भिंगारकरांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. शुक्रवारी विसर्जनादरम्यान कोणत्याही मंडळाने मिरवणूक काढून गर्दी केली नाही. मिरवणुकीला बंदी असल्याने विसर्जनासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले होते.

--------------------

१७ भिंगार गणपती

ओळी-भिंगार येथील देशमुख वाड्यातील मनाच्या गणपतीची जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या हस्ते आरती करून विसर्जन करण्यात आले. यावेळी समीर देशमुख, कार्तिक देशमुख, प्रज्वल देशमुख, अनिल मुळे, अश्विन देशमुख, मोरेश्वर मुळे, स्वप्निल मुळे, गोपाळ जोशी, प्रसाद कुलकर्णी आदी उपस्थित होते.

Web Title: Bhingarkar bids farewell to Ganarayana