इंस्टाग्रामवर झाली मैत्री, प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन प्रेयसी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:24 IST2021-09-21T04:24:04+5:302021-09-21T04:24:04+5:30

अहमदनगर/वैभववाडी (सिंधुदुर्ग) : इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला वैभववाडी पोलिसांनी अहमदनगरजवळील वरवंडे (ता. राहुरी) ...

Became friends on Instagram, ran away with boyfriend, young girlfriend | इंस्टाग्रामवर झाली मैत्री, प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन प्रेयसी

इंस्टाग्रामवर झाली मैत्री, प्रियकरासोबत पळाली अल्पवयीन प्रेयसी

अहमदनगर/वैभववाडी (सिंधुदुर्ग) : इंस्टाग्रामवर जुळलेल्या प्रेमसंबंधातून अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला वैभववाडी पोलिसांनी अहमदनगरजवळील वरवंडे (ता. राहुरी) येथून अटक केली. ऋषिकेश आनंदा जानकर (रा. नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या मुलीला ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केले.

तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीची अहमदनगरमधील युवकाशी इंस्टाग्रामवर मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. प्रेमसंबंध जुळल्याने ही मुलगी बुधवारी (दि. १५) सकाळी ७ वाजता घरातून निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी दुपारी वैभववाडी पोलीस स्थानकात दिली होती.

पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी मुलीच्या सोशल मीडियावरील संवादाचा सविस्तर तपशील घेऊन, त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरविली. तपासात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील ऋषिकेश आनंदा जानकर याने तिचे अपहरण केल्याची माहिती समोर आली. पोलीस पथकाने सोमवारी अहमदनगर येथील वरवंडे येथून ऋषिकेशला अटक केली आणि त्या मुलीला पालकांच्या स्वाधीन केले.

ओळखीचे प्रेमात रूपांतर झाल्याने, ऋषिकेश तिला भेटण्यासाठी अहमदनगरहून दुचाकीने वैभववाडीत आला होता. त्याच दुचाकीवरून तो तिला घेऊन गेला होता.

Web Title: Became friends on Instagram, ran away with boyfriend, young girlfriend