शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रहिमपूरचा लाचखोर तलाठी गजाआड

By admin | Updated: June 4, 2024 17:54 IST

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला सापळा रचून पकडले.

संगमनेर : प्रवरा नदीला पाणी आल्याने लिलावातील वाळूचा उपसा उशिराने करण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा रहिमपूरचा तलाठी बाजीराव एकनाथ गडदे (रा. स्वामी समर्थ कॉलनी, मालदाडरोड) याला अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने सापळा रचून पकडले. सचिन रघुनाथ शिंदे यांनी रहिमपूर हद्दीतील प्रवरा नदीपात्रामधील घेतलेल्या वाळू उपसा लिलावाची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती. परंतु भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात अचानक झालेल्या पावसाने प्रवरेला मोठ्या प्रमाणावर पाणी आले. त्यामुळे सुरू असलेला वाळूचा उपसा थांबवावा लागला. दरम्यान लिलावाप्रमाणे संपूर्ण वाळू काढता न आल्याची बाब शिंदे यांनी तलाठी गडदे याच्या निदर्शनास आणून दिली. तसेच रितसर पंचनामा करून उर्वरित वाळू पाणी ओसरल्यावर काढणार असल्याचे सांगितले. परंतु तसे करण्यासाठी गडदे याने शिंदे यांच्याकडे १० हजाराची मागणी केली. दरम्यान शिंदे यांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी लाचलुचपतचे निरीक्षक विजय मुर्तडक, चंद्रशेखर सावंत, हेड कॉन्स्टेबल वसंत वाव्हळ, रवींद्र पांडे, नितीन दराडे, प्रमोद जरे, सुनील पवार, राजेंद्र सावंत, एकनाथ आव्हाड, श्रीपाद ठाकूर व पथकाने पंचायत समितीनजीक सापळा लावला. शिंदे यांच्याकडून १० हजाराची लाच घेताना पथकाने गडदे यास रंगेहाथ पकडले. मतदार नोंदणीसाठी आज अखेरचा दिवसअहमदनगर: विधानसभा निवडणूक मतदार नोंदणीसाठी बुधवारी अखेरचा दिवस आहे़ अखेरच्या दिवशी जिल्हाभर मतदार नोंदणी विशेष मोहीम राबविण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ही मोहीम राबविली जाणार आहे़ नागरिकांनी या मोहिमेंतर्गत नाव नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कवडे यांनी केले आहे़मतदार नोंदणीची निरंतर प्रक्रिया सुरू असते़ त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर ५० हजार नवीन मतदारांची नोंदणी झाली असून, जिल्ह्यातील मतदारांची संख्या ३२ लाख ४ हजार ३५३ झाली आहे़ विधानसभा निवडणुकीसाठी येत्या १५ आॅक्टोबर रोजी मतदान घेण्यात येत आहे़ उमेदवारी अर्ज दाखल करण्याची २७ सप्टेंबर रोजी अंतिम मुदत आहे़ नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिवसाच्या दहा दिवस आधीपर्यंत मतदार नोंदणी करता येते़ त्यानुसार नव्याने मतदार नोंदणी करण्यासाठी बुधवारी शेवटची संधी असून, मतदार नोंदणीसाठी विशेष मोहीम राबविली जात आहे़ दि़ १ जानेवारी २०१४ रोजी वय १८ वर्षे झाले आहे़ परंतु अद्यापपर्यंत मतदार यादीत नाव नाही, अशा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी शेवटची संधी म्हणून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली जात असल्याचे सांगण्यात आले आहे़श्रीरामपूर मतदारसंघ वगळता इतर सर्व मतदारसंघात ही मोहीम राबविली जाणार आहे़ मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदार नोंदणी केली जाणार आहे़ नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणी करावी़ संबंधित मतदान केंद्राचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी मतदान केंद्रांवर उपस्थित राहतील़ नागरिकांनी क्रमांक- ६ चा अर्ज घेऊन नाव नोंदणी करावी़ विधानसभा निवडणुकीत ज्यांना मतदानाचा हक्क बजवायचा आहे, त्यांनी विशेष मोहिमेंतर्गत नाव नोंदणी करावी, असे आवाहन कवडे यांनी केले आहे़