शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 14:36 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. दारु दुकाने सर्रास सुरु असून, इतर सर्व व्यवहार बंद ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त करून महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दारूचा अभिषेक घालण्यात आला. यावेळी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे, उपशहर अध्यक्ष गणेश शिंदे, संकेत व्यवहारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. दारु दुकाने सर्रास सुरु असून, इतर सर्व व्यवहार बंद ठेवल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.

कोरोना महामारीच्या काळामध्ये सरकारने लॉकडाऊन जाहीर करत सर्व व्यापार ठप्प करण्यात आले. सरकारने फक्त दारू विक्री चालू ठेवण्याचे आदेश दिले. कपड्याच्या दुकान, किराना, मोबाईलच्या दुकान, ऑटोमोबाईल या सर्व क्षेत्रांमध्ये काम करणारे कामगार आज दोन ते तीन महिने झाले त्यांना पगार नाही. त्यांना कोणतीही शासनाची मदत नाही. किराणामाल चोरून विकायचे व दारू खुलेआम विक्री होत आहे. सर्वसामान्य दुकानदाराची आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे. सरकारने दारूविक्री पार्सल सुविधा चालू करण्याचे आदेश दिलेले आहे. शहरांमध्ये १० हाजार रिक्षावाले आहे, त्यांना फक्त ५०० रिक्षावाल्यांना सरकारने मदत केलेली आहे व बँक फायनान्स कंपनी यांच्या हप्ते भरायला सुद्धा सर्वसामान्य नागरिक व्यापारी कामगार यांच्याकडे पैसे राहिलेले नाही आणि कुठल्या प्रकारचे बँकवाले थांबत नाही. सरकारने सर्वसामान्यांचा विचार करून  योग्य नियोजन करून बाजारपेठ लवकरात लवकर चालू करण्याचे आदेश देण्यात यावेत. सरकारचा मनसेच्या वतीने जाहिर निषेध करण्यात आला व येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन मनसेच्या वतीने रास्तारोको आंदोलन केला जाईल, असा इशारा मनसेचे नितीन भुतारे यांनी दिला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMNSमनसे