शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: अहो आश्चर्यम्! मादी श्वानाला लागलाय मांजरीचा लळा; अनोखं दृश्य पाहण्यासाठी वाटसरुंची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 08:45 IST

जन्म झाल्यानंतर आई गमावणाऱ्या मांजरीच्या पिल्लाची कुत्री घेतेय काळजी

- मच्छिंद्र अनारसे

कर्जत (जि. अहमदनगर ) : जुन्या काळी "बाई माझ्या बकरीचा संमद्यासनी लागलाय लळा"  हे गाणं लोकप्रिय झाले होते.  त्याप्रमाणे कर्जतमध्ये "बाई माझ्या कुत्रीला लागलाय मांजराचा लळा"  असं म्हणायची वेळ आली आहे. मांजर आणि कुत्रा यांचं वैर सर्व श्रुत आहे. मात्र कर्जत शहरात हॉटेल व्यावसायिक छोट्या राऊत यांच्या घरी मांजराचे पिल्लू कुत्रीचे दूध पित आहे. हे दृश्य सर्वत्र कुतूहलाचा विषय बनले आहे.

कर्जतपासून जवळच असलेल्या कर्जत शिंदेवाडी रोडलगत छोट्या राऊत यांचे हॉटेल आहे. येथे कुत्री, तिची पिल्ले आणि मांजर कुटुंबातील सदस्य बनले आहेत. छोट्या राऊत यांचे कर्जत शिंदेवाडी रोड लगत छोटे हॉटेल आहे. तेथे कुत्री आणि मांजर दोघे एकाचवेळी प्रसूत झाले. मांजरीला सहा पिल्ले झाली तर कुत्रीला पाच पिल्ले झाली. मात्र दुर्दैवाने मांजर आणि तिची पाच पिल्ले मरण पावली. मांजराचे एक पिल्लू जिवंत राहिले. या लहान पिल्लाला जगवायचे कसे ? असा प्रश्न छोट्या राऊत यांना पडला होता. कारण ते पिल्लू काही खात नव्हते. मग एक दिवस कुत्रीच्या पिल्लासोबत मांजराच्या पिल्लाला कुत्रीला पाजले. मग हे नित्याचेच झाले. छोट्या राऊत यांनी कुत्रीची पिल्ले विकली. तेव्हापासून तर ही कुत्री व मांजराचे पिल्लू एकत्रच रहात आहेत. खेळतात एकत्र, बागडतात एकत्र. मांजरीच्या पिल्लाचा कुत्रीने सांभाळ केला. त्याच्याकडे आपल्या लेकराप्रमाणे लक्ष ठेवते. हा प्रकार पाहून वाटसरू आश्चर्यचकित होतात. कुत्र व मांजर यांचे हाडवैर असते हे आतापर्यंत प्रत्येकाने पाहिले आहे. ऐकले आहे. मात्र याला कर्जत येथील घटना अपवाद ठरली आहे. हे अनोखे दृश्य पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे मातृत्व पाहण्यासाठी गर्दी होत आहे.