शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अडिचशे मल्लांची हजेरी

By admin | Updated: December 20, 2015 23:23 IST

अकोले : राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा व तालुका तालीम संघ यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला अकोल्यात प्रारंभ झाला.

अकोले : राज्य कुस्तीगीर परिषद, जिल्हा व तालुका तालीम संघ यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी निवड चाचणी कुस्ती स्पर्धेला अकोल्यात प्रारंभ झाला. स्पर्धेतून महाराष्ट्र केसरीसाठी माती व मॅट अशा दोन गटांतून खेळाडू निवडण्यात येणार आहेत. महाराष्ट्र केसरी सईद चाऊस, अशोक शिर्के, गुलाब बर्डे, सुवर्णपदक विजेती कुस्तीपटू अंजली देवकर यांच्या उपस्थितीत अगस्तीऋषींच्या भूमीत या स्पर्धा होत आहेत. रविवारी सकाळी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते व भाजपा नेते अशोक भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे उद्घाटन झाले. बर्डे, शिर्के, अंजली देवकर या अस्सल हिऱ्यांनी महाराष्ट्र केसरी व सुवर्णपदक मिळवत नगर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. आता अगस्तीच्या पावन भूमीतून आशीर्वाद घेऊन येथे खेळलेले मल्ल नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्पर्धेचा महाराष्ट्राचा कुस्ती आखाडा निश्चित गाजवतील, अशी आशा माजी खासदार वाकचौरे यांनी व्यक्त केली. दिवसभर येथील अगस्ती विद्यालयाच्या मैदानावर कुस्त्यांचा आखाडा नामांकित मल्लांनी गाजवला. महाराष्ट्र केसरीसाठी ही जिल्ह्याची निवड स्पर्धा असून १४ तालुक्यांतील जवळपास २५० मल्ल यात सहभाग झाले. मॅट आणि माती अशा दोन मैदानांवर या कुस्त्या खेळल्या गेल्या. ५७, ६१, ६५, ७०, ७४, ८६, ९७ व १२५ किलो वजनगटात अशा आठ गटांत या स्पर्धा रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ, स्वागताध्यक्ष शिवाजी धुमाळ, तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे, अ‍ॅड. वसंत मनकर, निलेश भांगरे, डॉ. रवी गोर्डे, उमेश बाळसराफ, चंदन वस्ताद, भोईर गुरुजी, दिलीप भांगरे, निखिल जगताप, सुधीर रावले, बाबासाहेब नाईकवाडी, प्रमोद मंडलिक आदींनी स्पर्धेचे नियोजन केले. (तालुका प्रतिनिधी)