शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांचा गुच्छ!

By admin | Updated: August 12, 2016 13:18 IST

नातेसंबंधातील वीण आनंद, स्नेहभाव, प्रेम वाढवते. पण सद्यस्थितीत ही वीण सैल होत आहे. काही ठिकाणी पूर्णत: तुटतही आहे

- प्रा. डॉ. यशवंत पाटील
 
नातेसंबंधातील वीण आनंद, स्नेहभाव, प्रेम वाढवते. पण सद्यस्थितीत ही वीण सैल होत आहे. काही ठिकाणी पूर्णत: तुटतही आहे. त्याला योग्य-अयोग्य, समर्थनीय-असमर्थनीय अनेक कारणे असू शकतात. शरीराने जवळ राहिले म्हणजे नातेसंबंधाची वीण घट्ट आणि दूर राहिल्यास ही वीण सैल होते असे सरसगट म्हणता येणार नाही. पण नात्या-नात्यात ‘प्रेम’ हा अडीच अक्षरी शब्द मनात ठासून भरलेला असेल तर नातेसंबंध सहज फुलतात-बहरतात, गंधीत होतात.
नातेसंबंधाविषयी राम आणि रावणातील संवाद मनोज्ञ आहे. रावण मृत्यू शय्येवर होता तेव्हा त्याने रामाला सांगितले, ‘प्रत्येक बाबतीत मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. वयाने, बुद्धीने, सामर्थ्याने आणि कुटुंब विस्तारानेसुद्धा. माझी लंका सोन्याची, राज्य विस्तार प्रचंड, धन-संपदेने खजीना भरलेला... असे सर्व काही असूनही मी तुझ्याकडून पराभूत का झालो? तर रामा ! तुझ्याबरोबर तुझा भाऊ लक्ष्मण होता. तर माझा भाऊ विभीषण माझ्या विरुद्ध होता. कुऱ्हाडीला एखाद्या झाडाचा लाकडी दांडा असतो त्या कुऱ्हाडीनेच दुसरे ‘झाड’ तोडले जाते. ‘कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ होतो.’
नातेसंबंध मजबूत करण्यासाठी एकमेकांबद्दल स्नेहभाव असावा लागतो. हलक्या कानाचे असून चालत नाही.’ पोटात गेलेले विष त्या व्यक्तीला संपवते, पण कानात गेलेले विष किती तरी नाती तोडते, संपवते.
यासाठी चुका सांभाळून घ्याव्या लागतात. काहींकडे कानाडोळा करायचा असतो. काही प्रेमाने योग्यवेळी दुरुस्त करायच्या असतात. काही वेळा स्पष्टही बोलावे लागते. एकमेकांकडून अवास्तव, अवाजवी अपेक्षाही ठेवायच्या नसतात. योग्य तो त्यागही करायचा असतो. नातेसंबंध विविध रंगी फुलांच्या मोठ्या बहारदार सुंदर गुच्छासारखे असावे. आपण त्यात एक फूल म्हणून रहावे. नात्याच्या गुच्छात बहरावे.