जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2020 05:00 AM2020-08-13T05:00:00+5:302020-08-13T05:00:17+5:30

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गर्दीला आवर घालण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या वास्तूत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मलगणद्वारे ताप मोजण्याची सुरुवात केली होती.

Zilla Parishad Social Welfare Department Seal | जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील

जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग सील

Next
ठळक मुद्देकोरोना संसर्गाची धास्ती : अधिकारी-कर्मचाऱ्यांची होणार तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या वास्तूत अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. सोमवारी एका अधिकाºयाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी समाजकल्याण विभागाला टाळे लावण्यात आले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. मात्र जिल्ह्याचे मिनीमंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेत सतत नागरिकांची वर्दळ आहे. विविध विभागात कामानिमित्त नागरिक येत आहे. नागरिकांची गर्दी पाहून काही कर्मचारी संघटनांनी अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे गर्दीला आवर घालण्याची मागणी केली होती. तसेच जिल्हा परिषदेच्या वास्तूत प्रवेशद्वारावर सॅनिटायझर व थर्मलगणद्वारे ताप मोजण्याची सुरुवात केली होती. त्या उपरही नागरिकांची वर्दळ सुरूच आहे. जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार ग्रामीण भागात विविध ठिकाणी कार्यरत आहे. यात समाज कल्याणचे एक वरिष्ठ अधिकारीसुद्धा ग्रामीण भागात सातत्याने दौºयावर होते. त्यांचा कोरोना अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्यांना उपचारार्थ दाखल करण्यात आले.
बुधवारी जिल्हा परिषदेच्या वास्तूतील तळमजल्यावरील समाज कल्याण विभागाला टाळे लावण्यात आले. या विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांची आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय लगतच्या महिला व बालकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचीसुद्धा येत्या काही दिवसात कोरोना चाचणी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात आले. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय वास्तूत कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. बुधवारी वर्दळीला काही प्रमाणात आळा बसला होता. मात्र काही विभागात नेहमीप्रमाणे गर्दी दिसून येत होती. या गर्दीला आळा न घातल्यास प्रशासकीय इमारतीत कोरोनाचा संसर्ग आणखी वाढण्याची भीती कर्मचाºयांनी व्यक्त केली.

२० ऑगस्टला होणार सर्वसाधारण सभा ऑनलाईन
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे गेल्या वेळी ऑनलाईन सर्वसाधारण सभा घेण्यात आली. आता येत्या २० ऑगस्टला पुन्हा ऑनलाईन सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. तत्पूर्वी १७ ऑगस्टला जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यासंबंधी सभा आयोजित केली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेला डॉक्टर असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी लाभल्याने कोरोना संसर्गावर त्यांनीच मात करण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Zilla Parishad Social Welfare Department Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.