शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या दबावात ठरणार जिल्हा परिषद पदाधिकारी

By admin | Updated: September 15, 2014 00:24 IST

जिल्हा परिषदेत आपला टक्का कायम राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी अग्रेसर आहेत. तर काँग्रसेकडून विधानसभेच्या दबावात सामोपचाराची भूमिका स्वीकारण्यात येत आहे. याच दबावात जिल्हा

सुरेंद्र राऊत ल्ल यवतमाळ जिल्हा परिषदेत आपला टक्का कायम राहावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी अग्रेसर आहेत. तर काँग्रसेकडून विधानसभेच्या दबावात सामोपचाराची भूमिका स्वीकारण्यात येत आहे. याच दबावात जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षासह सभापतींची निवड केली जाणार आहे. शिवाय या निवड प्रक्रियेवर पंचायत समितीमध्ये झालेल्या दगाफटक्याचाही प्रभाव राहणार आहे. राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेत पहिल्या अडीच वर्षात शिवसेना, भाजपला सोबत घेऊन काँग्रेसला विरोधी बाकावर बसविले होते. आताही राष्ट्रवादीने विधानसभा निवडणूक पाहून काँग्रेसची कोंडी सुरू केली आहे. आघाडी करण्याबाबतची भुमिका राष्ट्रवादीकडून आमदार संदीप बाजोरिया यांनी सरुवातीलाच स्पष्ट केली होती. अध्यक्ष पद मिळणार असेल तरच बोलणी करण्यात येईल असे, जाहीर केले होते. त्यामुळे काँग्रेसने अध्यक्षपदावर पाणी सोडूनच राष्ट्रवादीसोबत बसण्याचा निर्णय घेतल्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूकीपूर्वी काँग्रेसची नेतेमंडळी उगीच पंगा घेणार नाही, हे हेरून राष्ट्रवादीकडून व्यूहरचना आखली जात आहे. आमदार संदीप बाजोरिया यांनी आपला दबदबा कायम ठेवत अध्यक्षपदासोबतच महत्वपूर्ण खातेही राष्ट्रवादीकडेच राहावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.यात अर्थ व बांधकाम सभापती आणि समाजकल्याण सभापतीपद घेण्यात येणार आहे. तर काँग्रेसकडे उपाध्यक्षपदासोबत शिक्षण व आरोग्य सभापती आणि महिला बालकल्याण सभापतीपद दिले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये काँग्रसेकडून उपाध्यक्षपदासाठी ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब मांगुळकर यांच्या नावाची चर्चा आहे. तर उर्वरित दोन सभापतीपद आर्णी आणि वणी विधानसभेत देण्याच्या हालचाली सुरू आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांकडून जिल्हा परिषदेतील निवड प्रक्रियेच्या माध्यमातून विधानसभेतील समिकरणाची जुळवाजुळव करण्यात येत आहे. त्यामुळे एकट्या यवतमाळ विधानसभेत उपाध्यक्षासोबतच आणखी दोन सभापती पद राहणार आहे. राष्ट्रवादी बांधाकम व अर्थसभापती सुभाष ठोकळ यांचीच पून्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. समजाकल्याण सभापतीपदासाठी लता खांदवे यांच्या नावची चर्चा आहे. मात्र याबाबत दोन्ही पक्षाकडून अधिकृतरित्या काहीही सांगण्यात आले नाही. २० सप्टेंबर रोजी उमेदवार निश्चत केले जाईल असे सांगण्यात येत आहे.