शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सात कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देसर्वसाधारण सभा : ऑनलाईनमुळे गोंधळाचे वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल तीन महिन्यानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी पार पडली. या ऑनलाईन सभेत सात कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मात्र अनेक सदस्यांनी या सभेत सहभाग घेता आला नसल्याबद्दल संताप व्यक्त केला.अध्यक्ष कालिंदा पवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीच्या सभागृहात सोमवारी दुपारी ऑनलाईन पद्धतीने सभा सुरू झाली. यावेळी सर्व पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. सभागृहात मोठा स्क्रिन लावण्यात आला होता. लॉकडाऊनमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी एकत्रित येण्यास बंदी घातल्याने पहिल्यांदाच ही सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. त्यात जिल्हा परिषद सदस्य आपापल्या पंचायत समितीतून ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले. अध्यक्षांनी पंचायत समितीनिहाय सदस्यांना बोलण्याची संधी दिली. मात्र मधातच माजी उपाध्यक्षांनी बराच काळ विविध प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.अध्यक्षांनी सर्व सदस्यांना प्रश्न मांडण्याची संधी मिळावी म्हणून पंचायत समितीनिहाय सदस्यांना बोलू द्यावे, अशी भूमिका मांडली. त्याला सदस्यांनीही पाठिंबा दिला. त्यानुसार काही पंचायत समितींमधून सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. मात्र मधातच माजी उपाध्यक्ष बोलू लागल्याने काही सदस्यांनी संताप व्यक्त केला.अनेक सदस्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. याशिवाय ऑनलाईन सभा असल्याने वारंवार नेटचासुद्धा व्यत्यय येत होता. ओरडून बोलूनही सदस्यांचे बोलणे नीट समजत नव्हते. त्यामुळे सभेतच गोंधळाचे वातावरण होते. अखेर अध्यक्षांनी सर्व सदस्यांना या सभेतील प्रश्न नंतर लेखी स्वरूपात प्रशासनाकडे देण्याचे निर्देश दिले.या सभेत बांधकाम विभागाच्या सात कोटी १७ लाखांच्या विविध कामांना मंजुरी देण्यात आली. या निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. सर्व सदस्यांच्या मतदारसंघात समान निधी देणार असल्याचे बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील समस्या कायमचसोमवारी झालेली सर्वसाधारण सभा ही गेल्यावेळी तहकूब झालेली सभा होती. त्यामुळे या सभेत गेल्या प्रोसिडींगवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात रस्ते दुरुस्तीच्या कामाचाही समावेश आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील समस्या अद्यापही कायमच आहे. सदस्यांना ऑनलाईन पद्धतीमुळे अनेक समस्या उपस्थित करता आल्या नाही. आता नवीन सभेतच समस्या मार्गी लागण्याची शक्यता आहे. सभेला अध्यक्ष कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, बांधकाम व अर्थ सभापती राम देवसरकर, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा व विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

टॅग्स :Socialसामाजिक