शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ, पुसदमध्ये तरुणांचा खून

By admin | Updated: May 14, 2016 02:19 IST

जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या असून यवतमाळ शहरातील तलाव फैलात ....

दगड, फावड्याचा वापर : एकाचा वैमनस्यातून तर दुसऱ्याचा जागेच्या वादात यवतमाळ/पुसद : जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडकीस आल्या असून यवतमाळ शहरातील तलाव फैलात जुन्या वादातून तरुणाचा फावड्याने तर पुसद तालुक्यातील कुंभारी येथे जागेच्या वादात तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. यवतमाळ शहरातील तलाव फैल परिसरातील पॉवर हाऊसमध्ये जुन्या भांडणातून केतन सुरेश गेडाम (१७) रा. तलाव फैल याचा गुरुवारी रात्री ९.३० वाजता खून करण्यात आला. यातील आरोपी अल्पवयीन असून त्याला शहर पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले. महिनाभरापूर्वी केतनचे वडील सुरेश गेडाम यांचा आरोपीच्या कुटुंबासोबत वाद झाला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखल पात्र गुन्हाही नोंदविण्यात आला. याच घटनेचा वचपा काढण्यासाठी आरोपीने गुरुवारी रात्री केतनसोबत वाद घातला. या वादात त्याच्यावर फावड्याने हल्ला करण्यात आला. त्यात केतन जागीच ठार झाला. या प्रकरणी केतनची आई विमल गेडाम यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचा अधिक पोलीस उपनिरीक्षक राहूल किटे करत आहे. कुंंभारी गावात थरार पुसद तालुक्यातील कुंभारी येथे जागेच्या वादात संदीप लक्ष्मण पवार (३०) या तरुणाचा गुरुवारी रात्री दगडाने ठेचून खून केला. गोविंद राम आडे (४५), गोपा फुलसिंग आडे (६०), विकास गोपा आडे (३०) आणि जगदीश बळीराम पवार (३६) सर्व रा. कुंभारी अशी आरोपींची नावे आहेत. आडे आणि संदीप पवार यांच्यात जागेचा वाद होता. याचा वचपा काढण्यासाठी गोविंद, गोपा आणि विकास या तिघांनी खुनाचा कट रचला. आमटी रस्त्यावर एका मंदिरासमोर पार्टी आयोजित केली. या पार्टीत जगदीश पवार संदीपला घेऊन आला त्या ठिकाणी जुना वाद उफाळून आला. या वादात गोविंदा आडे याने मोठा दगड उचलून संदीपच्या डोक्यात घातला. इतर आरोपींनी दगडाने ठेचून त्याला जागीच ठार केले आणि पसार झाले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता त्याचा मृतदेह मंदिराजवळ पडून असल्याचे दिसला. खंडाळा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. ठाणेदार बाळू जाधवर, जमादार राम पवार, कुणाल राठोड, साहेबराव नवलकर यांनी घटनास्थळ गाठले. या प्रकरणी संदीपचे वडील लक्ष्मण आमरू पवार यांनी खंडाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून चौघांविरूद्ध गुन्हा दाखाल केला. वृत्त लिहिस्तोर कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. (प्रतिनिधी)