शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

‘वसंत’च्या कामगारांनी अडविले साखरेचे ट्रक

By admin | Updated: November 11, 2015 01:52 IST

थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला.

वेतन-बोनस नाही : प्रशासन आणि कामगारांत तणाव वाढला उमरखेड : थकीत वेतनासाठी आंदोलन करणाऱ्या वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी साखर नेण्यासाठी आलेले ट्रक अडवून आपला रोष व्यक्त केला. दिवाळीच्या तोंडावरही कारखाना प्रशासन वेतन देत नसल्याने कामगार चांगलेच संतप्त झाले आहे. यातून कारखाना प्रशासन आणि कामगारात तणाव वाढला आहे.वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना गत १३ महिन्यांपासून पगार मिळाला नाही. वारंवार आंदोलने करूनही प्रशासन उपाययोजना करीत नाही. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी कारखान्याच्या गेटसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. परंतु अध्यक्षांसह संचालक मंडळाने दखल घेतली नाही. त्यातच कारखान्याने विकलेली साखर नेण्यासाठी मंगळवारी आठ ते दहा ट्रक कारखाना परिसरात आले. कामगारांना हा प्रकार माहीत होताच त्यांनी सर्व ट्रक अडविले. एकाही ट्रकला कारखान्याच्या आत प्रवेश करु दिला नाही. काही वेळातच हे सर्व ट्रक परत गेले. विशेष म्हणजे या कारखान्यात एक लाख २२ हजार साखरेच्या गोण्या शिल्लक आहे. त्यातील २५ हजार पोती साखर कारखान्याने विकली आणि तीच साखर नेण्यासाठी मंगळवारी ट्रक आले होते. परंतु कामगारांच्या रौद्ररुपापुढे कुणाचेही काहीच चालले नाही. गळीत हंगाम अद्याप सुरू झाला नाही. त्यातच कामगारांंना १३ महिन्यांपासून पगार नाही. यापूर्वी सतत २८ दिवस काम बंद आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर उमरखेडमध्ये भीक मागो आंदोलनही करण्यात आले. संचालक मंडळाने दोन महिन्याचे वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर तीन महिने झाले तरी एकाही कामगाराचा पगार दिला नाही. या दरम्यान अनेकदा निवेदने दिली. परंतु उपयोग झाला नसल्याने ६ नोव्हेंबरपासून कामगारांनी साखळी उपोषण सुरू केले. या उपोषणाला खासदार अ‍ॅड. राजीव सातव, आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार बापूराव पाटील आष्टीकर, माजी आमदार विजय खडसे, तातू देशमुख, अ‍ॅड. माधवराव माने, भीमराव पाटील, विलास चव्हाण आदींनी भेट देऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगारांचा तीव्र रोष कारखाना अध्यक्ष व संचालक मंडळावर दिसून आला. जोपर्यंत वेतन मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यानंतर ऊस उत्पादक राम देवसरकर, रमेश चव्हाण, डॉ.वि.ना. कदम यांनी कामगारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु कामगार वेतनावरच ठाम आहे. दिवाळी सण आला तरी अद्याप वेतन मिळाले नसल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)